बुधवार, ८ मार्च, २०१७

चीनची मोबाईल कंपनी ओपो भारतीय संघाची नवी प्रायोजक - ७ मार्च २०१७

चीनची मोबाईल कंपनी ओपो भारतीय संघाची नवी प्रायोजक - ७ मार्च २०१७

* चीनची मोबाईल कंपनी निर्माती ओप्पो मोबाईल कंपनीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळासोबत करार केला असून भारतीय क्रिकेट संघाला नवीन प्रायोजक ओपो मिळाला आहे.

* एकूण ५ वर्षासाठी हा करार करण्यात आला आहे. एप्रिल २०१७ पासून याची सुरवात होईल. बीसीसीआय आणि ओपो ५८३ कोटीपेक्षा जास्तचा करार करण्यात आला आहे.

* सध्या भारतीय संघाचे मुख्य प्रायोजक असलेल्या स्टार इंडियाने दुसऱ्यांदा प्रायोजकत्व मिळवण्यासाठी बोली न लावण्याचा निर्णय घेतला आहे.

* स्टार सोबत १ जानेवारी २०१४ ला करार करण्यात आला होता. ३१ मार्चला हा करार संपणार आहे. २०१३ ची सहाराचे प्रायोजकत्व स्टारने घेतले होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.