मंगळवार, १४ मार्च, २०१७

ब्रेग्झिट विधेयक ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये मंजूर - १५ मार्च २०१७

ब्रेग्झिट विधेयक ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये मंजूर - १५ मार्च २०१७

* युरोपियन समुदायातून ब्रिटनने बाहेर पडण्याच्या वाटाघाटी सुरु करण्याचा मार्ग सुकर करणारे ब्रेग्झिट विधेयक ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये मंजूर झाले.

* हाऊस ऑफ लॉर्ड्स या विधेयकात सुचलेल्या सुधारणा हाऊस ऑफ कॉमन्सने काल फेटाळून लावल्या. हे विधेयक मंजूर झाल्याने पंतप्रधान थेरेसा मे यांचा ब्रेग्झिट वाटाघाटीचा मार्ग खुला झाला आहे.

* आता या विधेयकास राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी मान्यता दिल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल. त्यानंतर पंतप्रधान थेरेसा मे लिस्बन करारातील ५० चा वापर करून युरोपीय समुदायातून ब्रिटनला बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु करतील. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.