मंगळवार, २१ मार्च, २०१७

ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक गोविंद तळवलकर यांचे निधन - २१ मार्च २०१७

ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक गोविंद तळवलकर यांचे निधन - २१ मार्च २०१७

* ज्येष्ठ लेखक आणि पत्रकार गोविंद तळवलकर यांचे बुधवारी अमेरिकेत निधन झाले. महाराष्ट्र आणि राष्ट्रीय राजकारणाचा सखोल अभ्यास असणारे व्यक्तिमत्व म्हणून ते सर्वाना परिचित होते.

* त्यांनी लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रातील त्यांची कारकीर्द विशेष गाजली त्यानंतर महाराष्ट्र टाइम्सचे संपादक म्हणून तब्बल २८ वर्षे त्यांनी काम केले.

* त्यांचे अग्निकांड युद्धाच्या छायेत ह्या स्तंभलेखनाचा पुस्तकरूपी संग्रह तसेच त्यांची एकूण २५ पुस्तके प्रसिद्ध झाली.

* पत्रकारिता कार्यासाठी उल्लेखनीय कामिगिरीबद्दल तळवलकर यांना महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा लोकमान्य टिळक पुरस्कार, बी डी गोएंका, दुर्गरतन अशा विविध पुरस्काराने गौरविण्यात आले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.