मंगळवार, २१ मार्च, २०१७

आनंदी देशांच्या यादीत भारत जगात १२२ व्या क्रमांकावर - २० मार्च २०१७

आनंदी देशांच्या यादीत भारत जगात १२२ व्या क्रमांकावर - २० मार्च २०१७

* आनंदी देशांच्या यादीत भारत जगात १२२ व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आता जगातील आनंदी देशांच्या यादीत भारत हा चीन, पाकिस्तान, आणि नेपाळपेक्षाही मागे पडला आहे.

* जगातील सर्वाधिक आनंदी देशांच्या यादीत नॉर्वेचा सर्वात वरचा क्रमांक लागतो. अमेरिकाही गेल्या वर्षीपेक्षा एका क्रमांकाने घसरली असून सध्या त्यांचा १४ वा क्रमांक आहे.

* द वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट २०१७ ने जगातील १५५ देशांच्या आनंदाच्या स्तराची पाहणी केली. त्यामध्ये नॉर्वेने गेल्या तीन अंकांनी वर उडी घेतली आणि डेन्मार्कला मागे टाकले. गेल्या ४ वर्षांपैकी ३ वर्षे डेन्मार्क पहिल्या क्रमांकावर होता.

* भारताचा २०१३-१४ मध्ये ११८ वा क्रमांक होता तो आता १२२ व्या क्रमांकावर गेला आहे. दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न, सामाजिक स्थिती, आरोग्यदायी जीवनशैली, भ्रष्टाचारा बाबतचा दृष्टीकोन आदी निकषावरून आनंदाचे मोजमाप करण्यात आले आहे.

* चीन ७९, पाकिस्तान ८०, नेपाळ ९९, बांगलादेश ११०, इराक ११७, आणि श्रीलंका १२०, यांनी भारताच्या पुढे मजल मारली आहे.

* आंतरराष्ट्रीय आनंदी निर्देशांक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात येथे अहवाल जारी करण्यात आला. नॉर्वेपाठोपाठ डेन्मार्क, आइसलँड, स्वत्झर्लंड, फिनलँड, नेदरलँड्स, कॅनडा, न्यूझीलँड, ऑस्ट्रेलिया, स्वीडन यांचा क्रमांक लागतो. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.