गुरुवार, २ मार्च, २०१७

पृथ्वीवरील सर्वात जुन्या जीवाश्मांचा शोध लागला - ४ मार्च २०१७

पृथ्वीवरील सर्वात जुन्या जीवाश्मांचा शोध लागला - ४ मार्च २०१७

* पृथ्वीवरील सर्वात जुन्या जीवाश्मांचा शोध लागला असून कॅनडात शोधलेले सूक्ष्मजीवांचे हे अवशेष ३.८ ते ४.३ अब्ज वर्षापूर्वीचे असल्याचा दावा करण्यात येत आहे.

* या अवशेषात सूक्ष्म तंतू आणि ट्यूब्स आहेत. कॅनडातील क्वीबेक शहरात एका चमकणाऱ्या दगडात हे अवशेष आढळून आले आहेत. हे सूक्ष्मजीव लोखंडावर राहत होते. असे जीव ३७७० दशलक्ष वर्षांपूर्वी आढळले होते.

* समुद्राच्या हायड्रोथर्मल सिस्टीममध्ये हे जीव राहत होते. ही समुद्रातील अशी जागा जिथे ज्वालामुखीच्या हालचाली कमी होतात. या भागातील गरम पाण्यामुळे हे जीव वाढत असावेत.

* वैज्ञानिकांच्या मते पृथ्वीच्या निर्मितीनंतर काही काळातच समुद्रात या जीवांची निर्मिती झाली. ज्यावेळी हे जीव पृथ्वीवर होते तेव्हा मंगळावर पाणी होते. असा दावा करण्यात आला आहे.

* पृथ्वीवरील हे सर्वात जुने जीव असल्याचे संशोधकांचे म्हणणे असून विश्वात इतरत्र जीवनाच्या खुणा शोधण्यातही याचा उपयोग होईल. असा दावा करण्यात आला आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.