गुरुवार, ३० मार्च, २०१७

सरकारच्या उडाण योजनेतील देशातील आज ४५ मार्ग जाहीर - ३० मार्च २०१७

सरकारच्या उडाण योजनेतील देशातील आज ४५ मार्ग जाहीर - ३० मार्च २०१७

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी उडाण योजना आज लाँच झाली असून या योजनेतील ४५ मार्ग जाहीर करण्यात आले आहेत.

* महत्वाचं म्हणजे या योजनेत महाराष्ट्रातील ५ शहरांचा समावेश आहे. व या मार्गावर अवघ्या अडीच हजार रुपयात प्रवास करण्यात येणार आहे.

* नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी देशभरातील या मार्गांची घोषणा केली. उडाण या योजनेनुसार एक तासाचा हवाई प्रवास अवघ्या अडीच हजार रुपयात करता येईल.

* या योजनेनुसार या मार्गावरील विमानातील एकूण सिट्सच्या ५०% सीट्स अडीच हजार रुपयांच्या असतील. त्याव्यतिरिक्त सीट्ससाठी नियमित मूल्य मोजावे लागणार, म्हणजे जो आधी तिकीट घेईल त्याला संधीचा फायदा मिळेल.

* उडाण योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. तसंच गुंतवणूक वाढेल असा विश्वास नागरी हवाई वाहतूक मंत्री गणपती राजू यांनी व्यक्त केला.

[ महाराष्ट्रातील उडाण योजनेतील हवाई मार्ग पुढीलप्रमाणे ]

* नांदेड - मुंबई, नांदेड - हैद्राबाद, नाशिक - मुंबई, नाशिक - पुणे, कोल्हापूर - मुंबई, जळगाव - मुंबई, सोलापूर - मुंबई हे असून सर्व मार्ग जून २०१७ किंवा सप्टेंबर २०१७ पासून सुरु होतील.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.