सोमवार, १३ मार्च, २०१७

सरकारचे सन २०२२ पर्यंत देशातील सौर वीज उत्पादन एक लाख मेगावॅट करण्याचे लक्ष - १४ मार्च २०१७

सरकारचे सन २०२२ पर्यंत देशातील सौर वीज उत्पादन एक लाख मेगावॅट करण्याचे लक्ष - १४ मार्च २०१७

* सरकारचे सन २०२२ पर्यंत देशातील सौर वीज उत्पादन एक लाख मेगावॅट करण्याचे लक्ष ठेवले आहे. केंद्रीय वीज मंत्री पियुष गोयल यांनी ही माहिती सांगितली.

* भारताने १० हजार सौर मेगावॅट वीज उत्पादनाची क्षमता गाठली आहे. अवघ्या तीन वर्षाहून कमी काळामध्ये सौर वीज उत्पादनामध्ये ३ पटीने वाढ झाली.

* २६ मे २०१४ रोजी भारताची सौर वीज उत्पादनाची क्षमता केवळ २६५० मेगावॅट होती ती आता १०००० हजार मेगावॅट अधिक झाली आहे.

* मध्य प्रदेशातील रेवा सोलर पार्कमध्ये कमी भांडवली गुंतवणूक आणि स्वस्त कर्ज याद्वारे वीज उत्पादन केले जात आहे. येथील विजेचा लिलाव होऊन प्रतियुनिट रुपये २.९७ या दराने ही वीज विकण्याचे जाहीर झाले आहे. देशातील विजेचा हा सर्वात कमी दर आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.