रविवार, १२ मार्च, २०१७

देशातील पाच राज्यांच्या निकालात भाजपची सरशी - १२ मार्च २०१७

देशातील पाच राज्यांच्या निकालात भाजपची सरशी - १२ मार्च २०१७

* उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा, आणि मणिपूर, या राज्यांच्या विधानसभा २०१७ च्या निवडणुकीचा निकाल लागला असून त्यामध्ये भाजप सर्वाधिक मताधिक्याने पुढे आहे. 

* उत्तरप्रदेशमध्ये विधानसभेच्या एकूण जागा ४०३ असून त्यामध्ये भाजप ३१२ जागा, समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांना ५४ जागा, बहुजन समाज पार्टी १९ जागा, इतरांना १७ जागा मिळाल्या. 

* पंजाब विधानसभेत एकूण जागा ११७ असून काँग्रेसला सर्वाधिक ७७ जागा, आम आदमी पार्टी २० जागा, अकाली दल १५ जागा, भाजप ३ जागा, इतरांना २ जागा मिळाल्या. 

* उत्तराखंड विधानसभेच्या एकूण जागा ७० असून भाजपला सर्वाधिक ५६ जागा, काँग्रेस ११ जागा, इतरांना २ जागा मिळाल्या. 

* गोवा राज्यात ४० जागा असून भाजपाला १३ जागा, काँग्रेसला १७ जागा, इतरांना १० जागा मिळालेल्या आहेत. 

* मणिपूरमध्ये ६० जागा असून त्यापैकी काँग्रेस २८, भाजप २१, इतरांना ११ जागा मिळाल्या आहेत. 

* सर्व राज्यातील बहुमतासाठी आवश्यक जागा अनुक्रमे उत्तरप्रदेश २०२, पंजाब ५९, मणिपूर ३१, गोवा २१, उत्तराखंड ३६ जागा आवश्यक आहेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.