सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१७

ZTE कंपनीने सादर केला जगातील पहिला ५ G गिगाबाईट स्मार्टफोन - २८ फेब्रुवारी २०१७

ZTE कंपनीने सादर केला जगातील पहिला ५ G गिगाबाईट स्मार्टफोन - २८ फेब्रुवारी २०१७

* चीनची दिग्गज स्मार्टफोन कंपनी ZTE ने जगातील पहिला ५ G गिगाबाईट स्मार्टफोन सादर केला. ZTE गिगाबाईट असे या स्मार्टफोनचे नाव आहे.

* बार्सिलोनामधील सुरु असलेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये रविवारी कंपनीने हा फोन सादर केला. १ जिबी प्रतिसेकन्ड डाउनलोड करता येण्याजोगा हा जगातील पहिला गिगाबाईट फोन असेल असा दावा कंपनीने केला आहे.

* हा फोन ५ जी नेटवर्कला सपोर्ट करतो आणि २०२० पर्यंत ५ जी नेटवर्क उपलब्द होऊ शकत. १ जीबी प्रतिसेकंद डाउनलोड म्हणजे सध्या वापरात असलेल्या ४ जी पेक्षा १० पटीने जास्त स्पीड त्याचा असणार आहे.

* म्हणजे एखादा सिनेमा डाउनलोड करण्यासाठी एका सेकंदापेक्षाही कमी वेळ लागेल. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर आहे. मोबाईलवर टीव्ही आणि सिनेमे बघण्याची आवड असणाऱ्यासाठी हा फोन पर्वणीच ठरणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.