सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१७

सुमित मलिक महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती - २८ फेब्रुवारी २०१७

सुमित मलिक महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती - २८ फेब्रुवारी २०१७

* सध्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आज मंगळवारी सेवानिवृत्त होत आहेत. तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सुमित मलिक यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

* मलिक हे १९८२ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. सध्या ते सामान्य प्रशासन विभाग चे अति मुख्य सचिव होते. ज्येष्ठतेच्या निकषावर त्यांना मुख्यमंत्र्यांनी ही नवीन संधी दिल्याचे म्हटले आहे.

* मलिक यांचा कार्यकाळ २ वर्षाचा असेल. शांत आणि संयमी स्वभावाचे तसेच शिस्तप्रिय अधिकारी म्हणून लौकिक आहे.

* व्यक्ती म्हणून प्रशासनावर छाप सोडण्याऐवजी शासकीय कामकाज अधिक परिणामकारक व सुरळीत होण्याच्या दृष्टीने व्यवस्था निर्माण करण्यावर त्यांचा नेहमीच भर राहिला आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.