शनिवार, २५ फेब्रुवारी, २०१७

भीम ऍपचा वर्ल्ड रेकॉर्ड - २६ फेब्रुवारी २०१७

भीम ऍपचा वर्ल्ड रेकॉर्ड - २६ फेब्रुवारी २०१७

* कॅशलेस व्यवहाराला चालना मिळावी यासाठी केंद्र सरकारने लॉन्च केलेल्या भीम अँपने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. तब्बल १ कोटी ७० लाख वेळेस हे अँप डाउनलोड करण्यात आले. हा एक विश्वविक्रम आहे.

* नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी याबाबत हे सांगितले. गेल्या वर्षी ३० डिसेम्बरला हे अँप सादर करण्यात आले होते. विना इंटरनेटही हे अँप वापरता येत हे ऍपचे वैशिट्य आहे.

* फोनमध्ये USSD कोड *९९# डायल करूनही हे ऍप वापरता येते. हे ऍप नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी डेव्हलप केलं आहे.

* लॉन्चिंगच्या केवळ तीन दिवसात गुगल प्लेवर फ्री ऍपच्या तक्त्यात भीम ऍप अग्रस्थानी होते. तर एका महिन्यात ५० लाख जणांनी हे ऍप डाउनलोड केलं होत.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.