मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०१७

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कंत्राट जिव्हिके - मिलानकडे - १४ फेब्रुवारी २०१७

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कंत्राट जिव्हिके - मिलानकडे - १४ फेब्रुवारी २०१७

* देशातील सर्वात मोठे विमानतळ साकारणाऱ्या स्पर्धक जीएमआरवर मात करत जीव्हीके-मिलानकडे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीचे १६,००० कोटी रुपयांचे कंत्राटही वाढीव महसूल हिश्याच्या जोरावर आपल्या पदरात पाडून घेतले.

* मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळातील देखण्या टर्मिनल२ चा विस्तार करणारी जीव्हीके मीआल यांच्या संयुक्त भागीदारीतून दशकातून प्रलंबित असलेल्या आर्थिक राजधानीतील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास येत्या दोन वर्षात होणे अपेक्षित आहे.

* नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा प्रकल्प खाजगी सार्वजनिक भागीदारीतून साकारला जाणार आहे. मुंबईतील प्रवासी वाहतूक २३% दराने वाढत असून हे विमानतळ २०१९ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

* २,२६८ हेक्टरवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार केला जाणार आहे. नव्या विमानतळासाठी मीआलची ७४%, भारतीय विमानतळ प्राधिकरण व सिडको यांची प्रत्येकी १३% भागीदारी असेल.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.