सोमवार, २० फेब्रुवारी, २०१७

राज्यात आज १० मनपा, ११ जीप, व ११८ पंचायत समिती साठी मतदान - २१ फेब्रुवारी २०१७

राज्यात आज १० मनपा, ११ जीप, व ११८ पंचायत समिती साठी मतदान - २१ फेब्रुवारी २०१७

* राज्यातील १० महानगरपालिका आणि दुसऱ्या टप्प्यातील ११ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत ११८ पंचायत समित्यांसाठी आज २१ तारखेला मतदान होणार आहे.

* या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण ३ हजार २१० जागांसाठी १७ हजार ३३१ उमेदवारांमध्ये लढत होत आहे. त्यासाठी ३ कोटी ७७ लाख ६० हजार ८१२ एवढे मतदार आहेत.

* आज मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती, नागपूर, या महानगरपालिकांसाठी निवडणूक होणार आहे.

* तर रायगड, रत्नगिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ, आणि गडचिरोली या जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी निवडणूक होणार आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.