बुधवार, ८ फेब्रुवारी, २०१७

आकाशगंगेत कृष्णविवराचे अवशेष सापडले - ९ फेब्रुवारी २०१७

आकाशगंगेत कृष्णविवराचे अवशेष सापडले - ९ फेब्रुवारी २०१७

* आपल्या आकाशगंगेच्या टोकाला असलेल्या प्रचंड वस्तुमानाच्या कृष्णविवराचे अवशेष सापडले आहेत. अतिशय वेगाने फिरणाऱ्या वैश्विक मेघाच्या विश्लेषणातून हे शक्य झाले.

* तुलनेने शांत कृष्णविवरे शोधली जाण्याची ही सुरवात आहे. अशी लक्षावधी कृष्णविवरे आकाशगंगेत असून आतापर्यंत फार थोडी गवसली आहेत. कृष्णविवरे काळी असल्याने व त्यातून प्रकाश बाहेर पडत नसल्याने ती सापडणे अवघड असते.

* जपानमधील कियो विद्यापीठाचे मासाया यामादा व टोमहारु ओका यांनी एसटीइ ही चिलीतील दुर्बीण व नोबेयामा रेडिओ वेधशाळेतील ४५ मीटरची रेडिओ दुर्बीण यांचा वापर करून, सुपरनोव्हाचे अवशेष डब्ल्यू ४४ च्या आजूबाजूला रेणवीय ढंगाचे निरीक्षण केले ते अवशेष १० हजार प्रकाशवर्षे दूर आहेत.

* आपल्या आकाशगंगेत १० कोटी ते १ अब्ज इतकी कृष्णविवरे असण्याची शक्यता असून त्यातील केवळ ६० कृष्णविवराचा शोध लागला आहे असे त्यांनी सांगितले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.