बुधवार, ८ फेब्रुवारी, २०१७

राज्यातील ६ रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास होणार - रेल्वे मंत्री सुरेश प्रभू ९ फेब्रुवारी २०१७

राज्यातील ६ रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास होणार - रेल्वे मंत्री सुरेश प्रभू ९ फेब्रुवारी २०१७

* सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या माध्यमातून देशभरातील एकूण २३ रेल्वेस्थानकांचा समावेश होणार आहे. अशी माहिती सुरेश प्रभू यांनी दिली. 

* यामध्ये राज्यातील बॉंबे सेंट्रल, लोकमान्य टिळक टर्मिनस [LTT], पुणे जंक्शन, ठाणे, बांद्रा, बोरिवली या सहा रेल्वेस्थानकांचा समावेश आहे. यामध्ये ए श्रेणीच्या रेल्वेस्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. 

* देशभरातील एकूण ४०७ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ३८ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. यापैकी प्रथम टप्प्यात देशभरातील २३ स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात महाराष्ट्रातील ६ स्थानकांचा समावेश आहे. 

* याशिवाय अकोला, अमरावती, बडनेरा, भुसावळ, चाळीसगाव, जळगाव, कुरवा, लातूर, मनमाड, मिरज, नाशिक रोड, पनवेल, साईनगर, शेगाव, अहमदनगर, दौड, कोल्हापूर, कोपरगाव, लोणावळा, बल्लारशाह, चंद्रपूर, वर्धा, नांदेड, औरंगाबाद, जालना, परभणी, गोंदिया, सीएसटी, नागपूर, कल्याण, दादर, सोलापूर या स्थानकांचा टप्प्याटप्याने विकास केला जाणार आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.