शनिवार, ११ फेब्रुवारी, २०१७

चीनची अलीबाबा कंपनी देणार भारतात मोफत इंटरनेट - ११ फेब्रुवारी २०१७

चीनची अलीबाबा कंपनी देणार भारतात मोफत इंटरनेट - ११ फेब्रुवारी २०१७

* चीनची अलीबाबा कंपनी देणार मोफत इंटरनेट सेवा देण्याची शक्यता आहे. भारतातील टेलिकॉम कंपन्या आणि वाय फाय सेवा देणाऱ्या कंपन्यांसोबत अलीबाबा कंपनी याबाबत चर्चा करताना एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले.

* अलीबाबा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी जॅक हुवांग यांनी बिजनेस इनसायडर इंडिया यांना माहिती दिली. भारतात सर्व राज्यामध्ये कनेक्टिव्हिटीची अडचण नसून ठराविक राज्यामध्येच अडचण आहे.

* तसेच सध्या इंटरनेट वापरत असलेल्या ग्राहकांचा आम्ही अभ्यास करणार आहोत असे सांगितले. भारतात मोफत इंटरनेट देणारी अलीबाबा ही पहिली कंपनी नसेल याआधी फेसबुकने Internet.org द्वारे असा प्रयत्न केला होता. याशिवाय सध्या रिलायन्स जियो ही कंपनी मोफत इंटरनेट देत आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.