शनिवार, ४ फेब्रुवारी, २०१७

१०० रुपयाची नवीन नोट चलनात येणार - ५ फेब्रुवारी २०१७

१०० रुपयाची नवीन नोट चलनात येणार - ५ फेब्रुवारी २०१७

* ५०० आणि १००० हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करून ५०० आणि २००० नवीन नोटा चलनात नुकत्याच आल्या आहेत. तोच आता आरबीआयने १०० नवी नोट चलनात आणण्याची तयारी रिझर्व्ह बँकेने सुरु केली आहे.

* मात्र १०० रुपयाच्या सध्या चलनात असलेल्या नोटा बाद न होताच चलनात कायम राहणार आहेत. ही नोट महात्मा गांधी सिरीजची २००५ सारख्याच असतील. यासंदर्भात रिझर्व्ह बँकेकडून जारी करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे.

* या नोटांच्या दोन्ही नंबरपॅनलवर इनसेटलेटर मध्ये आर हे अक्षर लिहिलेले असेल. तर नोटांचा छपाई वर्ष २०१७ असेल. त्याबरोबरच आरबीआय ५० आणि २० रुपयाच्या नव्या नोटाही चलनात आणणार आहेत. मात्र जुन्या नोटाही चलनात राहणार आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.