बुधवार, ८ फेब्रुवारी, २०१७

वेतन दुरुस्ती विधेयकाला २०१७ ला राज्यसभेची मंजुरी - ९ फेब्रुवारी २०१७

वेतन दुरुस्ती विधेयकाला २०१७ ला राज्यसभेची मंजुरी - ९ फेब्रुवारी २०१७

* औद्योगिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे वेतन धनादेश किंवा थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबतच्या विधेयकाला संसदेने बुधवारी मंजुरी दिली.

* या कायद्यामुळे वेतनाची ही पद्धत अवलंबण्याची गरज असलेले उद्योग निश्चित करण्याचा राज्य व केंद्राचा मार्ग मोकळा झाला आहे. वेतनातील पारदर्शकता हे कायद्यातील महत्वाचे पाऊल आहे असे मानले जाते.

* वेतन दुरुस्ती कायद्याला २०१७ ला बुधवारी राज्यसभेत आवाजी मतदानाने मंजुरी मिळाली असून, वेतनाचा हा मार्ग अवलंबिणे, आवश्यक असलेल्या उद्योगाबाबत राज्यांना अधिसूचना काढता येईल.

* या कायद्यानुसार कलम २० नुसार कायदयाचे उल्लंघन केल्यास सहा महिन्याची कैद होऊ शकते. शिवाय कारखाना कायदा १९४८ नुसारही निरीक्षक कायदा करू शकतो. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.