शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०१७

राज्यात महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीत भाजप सर्वात मोठा पक्ष - २४ फेब्रुवारी २०१७

राज्यात महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीत भाजप सर्वात मोठा पक्ष - २४ फेब्रुवारी २०१७

* मुंबई आणि ठाणे महानगरपालिकांमध्ये शिवसेनेन मोठी आघाडी घेतली असली तरीही एकूण राज्यातील ९ नगरपालिकांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे.

* मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नागपुरसह, अकोला, अमरावती, पिंपरी चिंचवड, नाशिक व पुण्यात भाजपाला संपूर्ण यश मिळाले.

* तसेच २५ जिल्हा परिषदांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडले. त्यांच्यापैकी २५ पैकी ९ जिल्हा परिषदांवर वर्चस्व राखत भाजप क्रमांक १ चा पक्ष झाला आहे.

* राष्ट्रवादी आणि कँग्रेसला प्रत्येकी ६-६ जिल्हा परिषदांमध्ये बहुमत प्राप्त झाले आहे. शिवसेनेला ३ जिल्हा परिषदांमध्ये बहुमत प्राप्त झाले आहे. तर रायगड जिल्हा परिषदेमध्ये शेकाप बहुमत मिळाले आहे.

* मराठवाड्यातील लातूर आणि औरंगाबाद मध्ये भाजप, नांदेडमध्ये काँग्रेस, परभणीत राष्ट्रवादी काँग्रेस, हिंगोली आणि बीडमध्ये त्रिशंकू परिस्थिती आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.