बुधवार, ८ फेब्रुवारी, २०१७

कमी खर्चात रोगनिदान करणारी चिप विकसित - ९ फेब्रुवारी २०१७

कमी खर्चात रोगनिदान करणारी चिप विकसित - ९ फेब्रुवारी २०१७

* वैज्ञानिकांनी साधारण इंकजेट प्रिंटर वापरून कमी खर्चात रोगनिदान करणारी चिप तयार केली असून त्याच्या मदतीने कर्करोगासह अनेक रोगांचे निदान शक्य आहे. जगातील विकसनशील देशात त्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकणार आहेत.

* [ लॅब ऑन चिप ] असे या उपकरणाचे स्वरूप असून त्याची किंमत एका चिपला एक सेंट एवढी आहे. यातील नवीन तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय निदानात मोठी क्रांती होणार आहे.

* मायक्रोफ्लुइड्स, इलेक्ट्रॉनिक व इंकजेट तंत्रज्ञान यामुळे दोन भागात ही चिप विकसित झाली आहे. त्यात पहिल्या भागात सिलिकॉन मायक्रोफ्लुइड चेंबर असते. त्यात पेशी घेतल्या जातात व त्याच भागात फेरवापराची इलेक्ट्रॉनिक चिप असते.

* दुसऱ्या भागात इंकजेट प्रिंटरने इलेक्ट्रॉनिक पट्टी पॉलिस्टरवर छापली जाते. ही एक चिप तयार करायला वीस मिनिटे लागतात. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.