मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०१७

टेट्राहर्टझ ट्रान्समीटर ५ जी प्रणाली विकसित - ७ फेब्रुवारी २०१७

टेट्राहर्टझ ट्रान्समीटर ५ जी प्रणाली विकसित - ७ फेब्रुवारी २०१७

* ५ जी या अलीकडच्या सर्वात वेगवान नेटवर्कपेक्षाही वेगाने डिजिटल माहिती पाठवणारी नवीन प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे डाउनलोड वेगाने शक्य होणार असून विमानातही नेटवर्कचा वेग जास्त असणार आहे.

* हिरोशिमा विद्यापीठ व नॅशनल इन्स्टिट्यूट इन्फॉर्मएशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या संस्थेतील वैज्ञानिकांनी सांगितले की टेट्राहर्ट्झ ट्रान्समीटर त्यांनी विकसित केला असून त्यातून डिजिटल माहिती सेकंदाला १०० गिगाबाईट वेगाने ३०० गिगाहॅट्झ बँडच्या एकाच मार्गिकेतून पाठवण्यात यश आले आहे.

* टीएचझेड बँड ही नवी व विस्तारित कंप्रता असून आगामी काळात अतिशय वेगाने बिनतारी संदेशवहन शक्य होणार आहे. बिनतारी माहिती वहन मेगाबाईट्स किंवा गिगाबाईट्स इतकी दर सेकंदाला असते. आता आपण टेराबाइकडे वाटचाल करत आहोत.

* एकाच दूरसंचार मार्गिकेतून हे शक्य होणार आहे. फायबर ऑप्टिक्समध्ये तारांच्या माध्यमातील संदेशवहन वेगवान झाले आहे. पण बिनतारी संदेशवहन फार वेगवान असणार आहे.

* मोबाईलवर वेगाने डाउनलोड, बेसस्टेशन म्हणून वेगवाहन संदेशवहन हे त्याचे उपयोग आहेत. टेट्राटाईट वायरलेस फार वेगवान फार असणार आहे. ऑप्टिकल फायबर्समध्ये प्रकाशाचा वेग कमी होतो त्यामुळे संदेशवहनाचा वेग वास्तवापेक्षा कमी असतो.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.