शनिवार, ४ फेब्रुवारी, २०१७

यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या रेल्वे प्रकल्पाना मान्यता - ४ फेब्रुवारी २०१७

यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या रेल्वे प्रकल्पाना मान्यता - ४ फेब्रुवारी २०१७

* रेल्वे बजेट यंदा सर्वसाधारण अर्थसंकल्पात विलीन झाला असला तरी त्यात महाराष्ट्राचा फायदाच झाला आहे. यंदा महाराष्ट्रातील अनेक प्रकल्पाना हिरवा झेंडा दाखवण्यात आला असून, त्यासाठी जवळपास ५ हजार ९५८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

* राज्यातील १३ नवीन मार्गाचे सर्वेक्षण, सहा नवीन प्रकल्पाना मंजुरी आणि चार मार्गावर विद्युतीकरण यांचा उल्लेख अर्थसंकल्पात आहे. मुंबईत दोन एलिव्हेटेड रेल्वेमार्ग आणि एका नविन कॉरीडॉरचा त्यात समावेश आहे.

* राज्यातील रेल्वेचे विद्युतीकरण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. यामध्ये दौड - बारामती, वणी - पिंपळकुट्टी, मिरज-कुर्डुवाडी-लातूर आणि गदग होटगी यांचा समावेश आहे.

* राज्यात रेल्वचे जाळे विस्तारण्यासाठी रेल्वेकडून १३ नवीन मार्गांचे सर्वेक्षणही होईल. यामध्ये सावंतवाडी-रेडी-फोर्ट, रामटेक-पारशिवनी-खापा, वर्धा-बल्लारशहा-चौथा मार्ग, भुसावळ-खांडवा-तिसरा व चौथा मार्ग, बिदर- नांदेड, बिलासपूर - नागपूर चौथा मार्ग.

* सहा नवीन प्रकल्पानाही मंजुरी देण्यात आली ते पुढीलप्रमाणे आहेत. पुणे - लोणावळा तिसरा व चौथा मार्ग, फलटण ते पंढरपूर, जेऊर ते आष्टी आणि हातकणंगले ते इचलकरंजी मार्ग आहेत.

* शकुंतला रेल्वे मूर्तिजापूर - यवतमाळ ११३ किमी, मूर्तिजापूर - अचलपूर ७७ किमी, पुलगाव - आर्वी ३५ किमी या महाराष्ट्रातील ब्रॉडगेज रूपांतर करण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आले आहेत.

* हा मार्ग नॅरो गेज आहे आणि तो फार पूर्वी एका खाजगी ऑपरेटरकडे होता. त्या मार्गाला शकुंतला असे नाव होते. आता तो शासनाने ताब्यात घेतला असून आता त्याचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी २ हजार १०० कोटी रुपये खर्च येईल.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.