गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१७

एसबीआयसह पाच सहयोगी बँकांचे विलीनीकरण - १६ फेब्रुवारी २०१७

एसबीआयसह पाच सहयोगी बँकांचे विलीनीकरण - १६ फेब्रुवारी २०१७

* एसबीआयसह पाच सहयोगी बँकांचे विलीनीकरणास सरकारने मंजुरी दिली आहे. जागतिक स्तरावर आकाराच्या दृष्टीने मोठी बँक बनविण्याच्या मागणीला या निमित्ताने मूर्त स्वरूप देण्यात आले.

* ज्या बँका एसबीआयत विलीन करण्यात आल्या त्या पुढीलप्रमाणे - स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ हैद्राबाद. यांचा समावेश आहे.

* या विलीनीकरणांनंतर एक मोठी बँक तयार होणार असून आकाराच्या दृष्टीने जागतिक स्तरावर ही एक मोठी बँक असेल. बँकेची ऍसेट बेस ३७ लाख कोटी रुपये होणार आहे.

* तर एसबीआयच्या शाखांची संख्या २२,५०० होणार आहे. तर बँकेचे ५८ हजार एटीएम असतील सध्या १६५०० शाखा आहेत. २००८ मध्ये स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र, त्यानंतर दोन वर्षांनी स्टेट बँक ऑफ इंदोर चे विलीनीकरण करण्यात आले होते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.