शनिवार, १८ फेब्रुवारी, २०१७

डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केले सौर शुष्कक - १९ फेब्रुवारी २०१७

डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केले सौर शुष्कक - १९ फेब्रुवारी २०१७

* डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केले सौर शुष्कक विकसीत केले आहे. या सौर शुष्ककचे उत्पादन वाळविण्याची क्षमता १०० किलो एवढी आहे.

* यामध्ये औषधी वनस्पती, सफेद मुसळी, पानपिप्री, हळद, मिरची, तसेच आवळा कँडी, बटाटे चिप्स, हिरवा भाजीपाला, इत्यादी वाळवण्यासाठी शुष्ककाचा वापर केल्यास पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत अधिक फायदेशीर आहे.

* कृषि विद्यापीठात अर्ध दंडगोलाकार शुष्कक बनविण्यात आला असून. यावर पपईचे सांगाडे लावले आहे. त्यात अल्ट्राव्हायोलेट पॉलिथिन फिल्मने झाकली आहे.

* या यंत्रात दिवसा हरितगृह परिणामामुळे आतील तापमानात वाढ होते. आतील तापमान हे वातावरणातील तापमानापेक्षा १५ ते २० डिग्री से अधिक राहते. व दुपारी १२ ते २ यावेळेत ६० ते ६५ डिग्री पर्यंत पोहोचते.

* जमिनीलगतचा पृष्ठभाग सिमेंट काँक्रीटचा बनवला आहे. त्यावर काळा रंग दिलेला आहे. काळ्या रंगाच्या गुणधर्मानुसार १००% उष्णता शोषून घेतली जाते. त्यामुळे जमिनीचे तापमान वाढते.

* शुष्कातील वाढलेल्या तापमानामुळेच गरम हवेच्या प्रवाहामुळे धान्य, भाजीपाला वाळण्यात मदत होते. या शुष्कातील गरम हवा व अतिनील किरणांमुळे पदार्थातील आद्र्रता कमी होऊन पदार्थ वाळतात.

* विशेष म्हणजे यावर पावसाचा तेवढा परिणाम होत नाही. गृहोद्योग, कृषी उद्योगांकरिता या तंत्रज्ञानाचा उत्तम फायदा होणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.