मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०१७

देशात सर्वाधिक ९४ प्रदूषित शहरांपैकी महाराष्ट्रातील १७ शहरे - २२ फेब्रुवारी २०१७

देशात सर्वाधिक ९४ प्रदूषित शहरांपैकी महाराष्ट्रातील १७ शहरे - २२ फेब्रुवारी २०१७

* देशात सर्वाधिक ९४ प्रदूषित शहरांपैकी महाराष्ट्रातील १७ शहरे आहेत. या १७ शहरात अनुक्रमे मुंबई, नवी मुंबई, बदलापूर, उल्हासनगर, पुणे, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, सोलापूर, चंद्रपूर, बदलापूर, अकोला, जळगाव, अमरावती, नाशिक, लातूर, सांगली, ही आहेत.

* २०११ ते २०१५ दरम्यानच्या कालावधीमध्ये केलेले सर्वेक्षण आणि चाचण्यांमधून राज्यातील शहरातील हवेमध्ये पार्टीक्युलेट मॅटर [पिएम १०] या प्रदूषित घटकाचे प्रमाण निश्चित पातळीपेक्षा किती तरी अधिक असल्याचे आढळून आले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने हे सर्वेक्षण केले आहे.

* पार्टीक्युलेट मॅटर १० चे वार्षिक सरासरी प्रमाण ६० आणि नायट्रोजन डायॉकसाईड वार्षिक सरासरी प्रमाण ४० पेक्षा जास्त असल्यास त्या शहरांना प्रदूषित शहरे म्हटले जाते.

* महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेश १५ शहरे, पंजाब ८, हिमाचल प्रदेश ७, गुजरात १, तामिळनाडू १, कर्नाटक ४, आंध्रप्रदेश ५ शहरे प्रदूषित आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.