रविवार, १९ फेब्रुवारी, २०१७

जगातील आठव्या झीलॅंडीया खंडाचा शोध लागला - २० फेब्रुवारी २०१७

जगातील आठव्या झीलॅंडीया खंडाचा शोध लागला - २० फेब्रुवारी २०१७

* न्यूझीलंडच्या शास्त्रज्ञानी हा आठवा खंड शोधून काढला. या खंडाचे नाव आहे झीलॅंडीया. ऑस्ट्रेलियाला लागून हा खंड त्यांनी शोधला.

* जिऑलॉजी सोसायटी ऑफ अमेरिका या जर्नलमध्ये या संशोधकांनी त्यांच्या या शोधाविषयी सांगितले आहे. हा आठवा खंड पाण्याखाली आहे.

* कोट्यवधी वर्षांपूर्वी जगातल्या वेगवेगळ्या खंडामध्ये खालच्या चित्रात दाखवल्याप्रमाणे बदल होत गेले. कोट्यवधी वर्षांपूर्वी होणारी हालचाल हीच सगळी हालचाल होत असताना सुमारे ८ कोटी वर्षांपूर्वी झीलॅंडीया चा हा भाग आताच्या ऑस्ट्रेलियापासून तुटला आणि पाण्याखाली गेला.

* हे सगळं पाणी आम्हाला बाजूला करून हा खंड अभ्यासाला मिळावा असे हा खंड शोधणारा संशोधक निक मॉर्टीयर रॉयटर्स या वृत्तसंस्थेला म्हणाला.

* कारण ४५ लाख चौरस किलोमीटरचा आणि पॅसिफिक महासागरात बुडालेला झीलॅंडीया चा अभ्यास करायचा असेल तर पाण्याखालीच जावे लागेल. नाही म्हणायला या खंडाचा ६% भूभाग समुद्रसपाटीवर आहे.

* आता यावर सर्व जागतिक स्तरावर शास्त्रज्ञाची चर्चा होणार, मतमतांतरे होतील आणि मग या खंडाला जागतिक मान्यता मिळेल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.