मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०१७

१ एप्रिलपासून जियो नेटवर्कचे नवे दर लागू - मुकेश अंबानी २२ फेब्रुवारी २०१७

१ एप्रिलपासून जियो नेटवर्कचे नवे दर लागू - मुकेश अंबानी २२ फेब्रुवारी २०१७

* रिलायन्स जियोचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी जियोबाबत आज मोठी घोषणा केली. ३१ मार्चनंतर जियोची सेवा मोफत नसेल. त्यांनी एका नवीन ऑफरची घोषणा केली त्यानुसार १ एप्रिलपासून प्राईम ऑफरची घोषणा त्यांनी केली.

* या ऑफरनुसार जियो ग्राहकांना ९९ रुपयात प्राईम मेंबरशिप घेता येईल. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी १ मार्च ते ३१ मार्च या काळात प्राईम मेम्बरशिपसाठी नोंदणी करावी लागेल.

* मेम्बरशिप घेतल्यास ३०३ रुपये प्रतिमहिना दराने ३१ मार्च २०१८ पर्यंत अनलिमिटेड वाईस कॉल व डेटा वापरता येईल. म्हणजे १ एप्रिल २०१७ पासून आता जियो वापरासाठी १० रुपये खर्च येणार आहे.

* जियोची प्राईम मेम्बरशिप जियोच्या वेबसाईटवर किंवा अँपवर मिळवता येईल, तसेच याशिवाय जियो स्टोअरमध्येही जाऊनही मेम्बरशिप मिळेल.

* अंबानी यांच्या मते जियोचे भारतात १७० दिवसात १० कोटी ग्राहक झाले. येणाऱ्या काही दिवसात ९९% युझर्स जियोचे असतील. तसेच सर्वाधिक मोबाईल डेटा वापर होणारी जियो जगातील पहिली कंपनी बनली.

* २०१७ च्या अखेरपर्यंत जियो नेटवर्क हे देशातील सर्व गावे शहरामध्ये उपलब्द असेल. देशातील ९९% नागरिकास जियो नेटवर्कचे कव्हरेज आम्ही पुरवू.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.