रविवार, १९ फेब्रुवारी, २०१७

शाहिद आफ्रिदीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा - २० फेब्रुवारी २०१७

शाहिद आफ्रिदीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा - २० फेब्रुवारी २०१७

* पाकिस्तान क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

* यासोबत आपल्या २१ वर्षातील कारकिर्दीत शाहिद आफ्रिदीने पूर्णविराम लावला आहे. आपल्या करिअरमधील उत्तरार्धात आफ्रिदी बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून ओळखू जाऊ लागला.

* आफ्रिदीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत फक्त २८ सामने खेळून त्यामध्ये ११७६ धावा काढल्या. १५६ हि त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्याने ४८ विकेट्सदेखील घेतले.

* एकदिवसीय खेळात आफ्रिदीने एकूण ३९८ सामने खेळून ८०६४ धावा काढल्या. एकदिवसीय सामन्यात १२४ हि आफ्रिदीची सर्वोच्च धावसंख्या आहे. तर त्याने आपल्या फिरकीच्या जोरावर ३९५ विकेट्सदेखील घेतल्या.

* टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आफ्रिदीने ९८ सामने खेळत १०४५ धावा काढल्या. यावेळी त्याने ९७ विकेट्स घेतल्या.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.