रविवार, १२ फेब्रुवारी, २०१७

अजय त्यागी सेबीचे नवीन अध्यक्ष - १३ फेब्रुवारी २०१७

अजय त्यागी सेबीचे नवीन अध्यक्ष - १३ फेब्रुवारी २०१७

* अर्थ मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी अजय त्यागी यांची भांडवली बाजार नियंत्रक संस्था अर्थात सेबी च्या अध्यक्षपदी शुक्रवारी निवड करण्यात आली. ही निवड पाच वर्षासाठी असणार आहे.

* सेबीचे अध्यक्ष यु के सिन्हा यांचा वाढीव कार्यकाळ १ मार्चला संपत असून त्यानंतर अजय त्यागी हे पदभार सांभाळतील. त्यागी हे हिमाचल प्रदेश क्रेडरचे १९८४ च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत.

* सध्या आर्थिक कामकाजात विभागात ते अतिरिक्त सचिव आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निवड समितीने त्यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. त्यागी हे काही काळ रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळातही होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.