रविवार, ५ फेब्रुवारी, २०१७

गुगल जगातील सर्वात लोकप्रिय ब्रँड - ६ फेब्रुवारी २०१७

गुगल जगातील सर्वात लोकप्रिय ब्रँड - ६ फेब्रुवारी २०१७

* गुगलने प्रतिस्पर्धी कंपनी अँपलला मागे टाकत जगातील सर्वात लोकप्रिय ब्रँड म्हणून आपल नाव कोरल आहे. ब्रँड फायनान्स या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार २०१७ मध्ये गुगल सर्वात विश्वासार्ह आणि मौल्यवान ब्रँड बनला आहे.

* ब्रँड फायनान्सनुसार गुगलची किंमत १०९.४ अब्ज डॉलर [७,१९४ अब्ज कोटी रुपये आहे ]. वर्ष २०११ पासून ऍपल एक नंबरवर विराजमान होता. मात्र यंदा हे स्थान गुगलने काबीज केले.

* आकड्यानुसार गुगलने मागील वर्षीच्या तुलनेत गुगलने २४% वाढ मिळविली आहे. ऍपलची ब्रँड व्हॅल्यू १४५ अब्ज डॉलर होती यावर्षी ती १०७ अब्ज डॉलर इतकी झाली आहे.

* गेल्या वर्षी आयफोन ७ आणि ७ प्लस लॉन्च करूनही ऍपलची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली. या सर्वेक्षणानुसार तिसऱ्या अमेझॉन आहे. चौथ्या स्थानावर अॅटी अॅंड टी, तर पाचव्या स्थानावर मायक्रोसॉफ्ट आणि सहाव्या स्थानावर सॅमसंग आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.