रविवार, ५ फेब्रुवारी, २०१७

क्रिकेटच्या प्रसिद्ध विस्डेन मासिकाच्या मुखपृष्ठावर विराट कोहली - ६ फेब्रुवारी २०१७

क्रिकेटच्या प्रसिद्ध विस्डेन मासिकाच्या मुखपृष्ठावर विराट कोहली - ६ फेब्रुवारी २०१७

* क्रिकेटचा धर्मग्रंथ मानल्या जाणाऱ्या [ विस्डेन ] च्या वार्षिक अंकाच्या मुखपृष्ठावर झळकण्याचा मान विराटला मिळाल्याने त्याच्या शिरपेचात एक मनाचा तुरा खोवला गेला आहे.

* २०१७ चा वार्षिक अंक एप्रिल महिन्यात प्रकाशित होणार असून अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून विस्डेनने हे प्रसिद्ध करण्यात आले. विस्डेनच्या अंकात झळकण्याचा मान मिळविणारा हा दुसरा भारतीय खेळाडू आहे.

* यापूर्वी २०१४ साली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर विस्डेनच्या मुखपृष्ठावर झळकला. नोव्हेंबर २०१३ मध्ये सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर विस्डेनने कव्हर फोटोतून त्याच्या कारकिर्दीला सलाम केला होता. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.