गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०१७

भारती एअरटेलने केले टेलिनॉरचे अधिग्रहण - २४ फेब्रुवारी २०१७

भारती एअरटेलने केले टेलिनॉरचे अधिग्रहण - २४ फेब्रुवारी २०१७

* दूरसंचार क्षेत्रातील दुसरे मोठे अधिग्रहण करताना भरती एअरटेलने गुरुवारी छोट्या गटातील टेलिनॉरच्या भारतातील व्यवसाय खरेदीचा व्यवहार पूर्ण केला. 

* लूप अर्थात पूर्वीची बीपीएल मोबाईल खरेदीनंतरचा भारती एअरटेलचा हा नवीन व्यवहार १,६०० कोटी रुपयाच्या घरात असण्याची शक्यता आहे. 

* वोडाफोन - आयडिया सेल्युलरची विलीनीकरण प्रक्रिया सुरु असतानाच आणि रिलायन्स जियोने १० कोटी मोबाइलधारकांचा टप्पा गाठला असतानाच, सात परिमंडळात ४.४० कोटी ग्राहक असलेल्या टेलिनॉरच्या खरेदीसह भारती एअरटेलचे आपले क्रमांकाचे स्थान अधिक भक्कम करू पाहत आहे. 

* सध्या ३३% बाजार महसूलसह भारती एअरटेल २६.९० कोटी ग्राहक राखून एकवर आहे. टेलिनॉरचा बाजारहिस्सा २.६०% वाढीनंतर एअरटेलचा महसूल हिस्सा ३५.६०% होणार आहे.   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.