शनिवार, १८ फेब्रुवारी, २०१७

सबला योजना

सबला योजना [ राजीव गांधी किशोरवयीन मुलींचे सक्षमीकरण ]

[ योजनेची उदिष्टे ]

* किशोरवयीन मुलींचा विकास सक्षमीकरण करणे.

* किशोरवयीन मुलींचा पोषण व आरोग्य दर्जा सुधारणे.

* आरोग्य, स्वछता, पोषण, प्रजनन, व लैंगिक आरोग्य, कुटुंब आणि बालकांची काळजी या विषयी किशोरवयीन मुलींमध्ये जाणीव जागृती निर्माण करणे.

* किशोरवयीन मुलींची गृह कौशल्ये, जीवन कौशल्ये आणि व्यवसाय कौशल्ये उंचावणे.

* शाळा गळती झालेल्या किशोरी मुलींना औपचारिक/अनौपचारिक शिक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणणे.

* किशोरवयीन मुलींना प्रचलित सार्वजनिक सेवा. उदा प्राथमिक आरोग्य केंद्र, पोस्ट, बँक, पोलीस स्टेशन, इ बाबत माहिती पुरविणे व मार्गदर्शन करणे.

[ योजनेचा लक्ष्यगट ]

* सबला या योजनेअंतर्गत ११ ते १८ वर्षे वयोगटातील सर्व किशोरवयीन मुलींचा लाभार्थी म्हणून समावेश आहे.

* किशोरी मुलीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी लक्ष्यगटाची दोन गटात विभागणी करावी. एका गटात ११ ते १४ वर्षे वयोगटातील किशोरी असतील तर दुसऱ्या गटात १५ ते १८ वर्षे वयोगटातील किशोरी असतील.

* यामध्ये ११ ते १८ वयोगटातील शाळेत न जाणाऱ्या सर्व मुलीचा प्राधान्याने समावेश असेल. त्यांचे आठवड्यातील २ ते ३ दिवस एकूण ५ ते ६ तास अंगणवाडी किंवा [सबला] केंद्रात वर्ग घेण्यात येतील.

* शाळेत जाणाऱ्या किशोरवयीन मुली सबला केंद्रात महिन्यातून किमान दोन वेळा आणि सुट्ट्यामध्ये येणे अपेक्षित आहे.

[ योजनेत पुरविण्यात येणाऱ्या सेवा आणि संबंधित कार्यवाही ]

* सबला केंद्रात येणाऱ्या किशोरींना जीवनविषयक कौशल्याचे शिक्षण, आहार, व आरोग्याचे शिक्षण आणि सामाजिक कायदे याविषयी माहिती देणे.

* सबला केंद्रात शाळेत जाणाऱ्या मुली आणि शाळेत न जाणाऱ्या मुलीमध्ये सुसंवाद घडवून आणणें आणि शाळेत न जाणाऱ्या मुलींची शिक्षणाकडे वळण्याची संधी निर्माण करणे.

* पूरक पोषण आहारासाठी प्रति लाभार्थी प्रति दिन रु ५ या दराने किशोरवयीन प्रत्येक लाभार्थी मुलींना ६०० कॅलरी आणि १८ ते २० ग्राम प्रोटीन आणि सूक्ष्म पोषण तत्वयुक्त आहार वर्षात ३०० दिवस देणे.

* शाळा सोडलेल्या ज्या किशोरी मुली अंगणवाडी किंवा सबला केंद्रात येतील त्यांना घरी नेवून खाण्यासाठी आहार देण्यात येईल.

* ११ ते १८ वर्षे वयोगातील शाळेतून गळती झालेल्या सर्व मुलींना टीएचआर द्यावा व १५ ते १८ वर्षे वयोगटातील शाळेत जाणाऱ्या मुलींना टीएचआर पुरवठा करणे.

* दोन्ही गटांना टीएचआर पुरवठा अंगणवाडी केंद्रातून करणे व त्यांचे वितरण व हिशेब रजिस्टर संबंधित माहिती अंगणवाडी किंवा सबला केंद्रात ठेवणे.

* प्रतिदिन प्रति लाभार्त्यास शिरा १४० ग्राम, उपमा १३० ग्राम, सुकडी १३० ग्राम, याप्रमाणे आहाराची पाकिटे पुरवावी.

* किशोरवयीन मुलींना सहा महिन्यातून एकदा जंतनाशक गोळी द्यावी. त्यानंतर एक आठवडा थांबून आयएफए गोळी दयावी.

* आरोग्य विभागाअंतर्गत किशोरवयीन मुलींची रक्त तपासणी करून घ्यावी.

* प्रत्येक मुलीकडे आरोग्य कार्ड असावे.

* NIPCCD या संस्थेने तयार केलेला अभ्यासक्रम वापरून मुलींना प्रशिक्षण दयावे. प्रत्येक अंगणवाडी क्षेत्रातून एक सखी व दोन सहेली अशा तीन मुलींची निवड करून त्यांना बिट पातळीवर प्रशिक्षण द्यावे.

* सखी सहेलीने गावातील इतर मुलींना प्रशिक्षण दयावे.

* किशोरींना पुरविण्यात येणाऱ्या सेवांची नोंदणी स्वतंत्र रजिस्टर मध्ये करावी.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.