गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०१७

गुगलच्या मदतीने पुणे बनणार वायफाय सिटी - ९ फेब्रुवारी २०१७

गुगलच्या मदतीने पुणे बनणार वायफाय सिटी - ९ फेब्रुवारी २०१७

* गुगलने पुणे स्मार्ट सिटी डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशनतर्फे जाहीर करण्यात आलेली वायफाय डील मिळविली आहे. यासाठी गुगल, आयबीएम, एल अँड टी आणि रेलटेल यांच्यासोबत काम कारणार आहे.

* या करारांतर्गत गुगल आपले गुगल स्टेशन प्लॅटफॉर्म जाळे शहरात उभारणार आहे. विशेष म्हणजे गुगल स्टेशन मिळवणारे पुणे जगातील पहिले शहर असणार आहे. ६ जानेवारीला हा करार करण्यात आला.

* सर्व सार्वजनिक ठिकाणांना वायफाय हॉटस्पॉटच्या माध्यमातून एकत्रित आणणे, आणि त्यासाठी फक्त एकदाच प्रमाणीकरण करायला लागावे हा स्मार्ट सिटीचा मिशनचा मुख्य उद्देश आहे. असे पुण्याचे आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले.

* यासाठी गुगलसोबत १५० कोटी रुपयाचा करार करण्यात आला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.