सोमवार, २० फेब्रुवारी, २०१७

आयपील २०१७ च्या लिलावात बेन स्टोक सर्वाधिक महाग खेळाडू - २१ फेब्रुवारी २०१७

आयपील २०१७ च्या लिलावात बेन स्टोक सर्वाधिक महाग खेळाडू - २१ फेब्रुवारी २०१७

* आयपील २०१७ च्या लिलावात बेन स्टोक सर्वाधिक महाग खेळाडू ठरत तब्बल १४.५० कोटी रुपयांना रायझिंग सुपर जायंटने खरेदी केले. त्यापाठोपाठ टायमल मिल्स याला रॉयल चॅलेंज बंगलोरने तब्बल १२ कोटीला विकत घेतले. बेन आणि मिल्स हे दोन्ही खेळाडू इंग्लंडचे आहेत.

* आयपीएलच्या १० व्या मोसमासाठी सोमवारी बंगलोरला क्रिकेटपटूंचा लिलाव करण्यात आला. एकूण ५५१ क्रिकेटपटूंचा लिलाव करण्यात आला. आयपीएलची सुरुवात ५ एप्रिलपासून होणार आहे. २१ मेला शेवटचा सामना होणार आहे.

* आयपीएल १० व्या मोसमातील पहिले १० सर्वाधिक महाग खेळाडू अनुक्रमे - बेन स्टोक्स १४.५० कोटी [पुणे], टायमल मिल्स १२ कोटी [RCB], कगिसो रबाडा ५ कोटी [दिल्ली], ट्रेंट बोल्ट ५ कोटी [कोलकाता], पॅट कमिन्स ४.५० कोटी [दिल्ली], ख्रिस वोक्स ४.२० कोटी [कोलकाता], रशीद खान ४ कोटी [हैद्राबाद], कर्ण शर्मा ३.२० कोटी [मुंबई], टी नटराजन ३ कोटी [पंजाब].

* खरेदी झालेले खेळाडू ६६, भारतीय खेळाडूंची झालेली खरेदी ३९, विदेशी खेळाडूंची झालेली खरेदी २७, सर्वाधिक खरेदी केलेला संघ - गुजरात लायन्स ११ खेळाडू, कमी खरेदी केलेला संघ रॉयल चॅलेंज बंगलोर ५ खेळाडू.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.