शनिवार, ४ फेब्रुवारी, २०१७

शकुंतला रेल्वेमार्ग होणार ब्रॉडगेज - ५ फेब्रुवारी २०१७

शकुंतला रेल्वेमार्ग होणार ब्रॉडगेज - ५ फेब्रुवारी २०१७

* विदर्भात ब्रिटिश काळापासून खाजगी संस्थानाच्या मालकीची आणि अनेक छोट्या छोट्या गावातील लोकांना सेवा देणारी शकुंतला रेल्वे आता भारतीय रेल्वेचा अविभाज्य घटक बनली आहे.

* यंदाच्या अर्थसंकल्पात या रेल्वेच्या रुळांची रुंदी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी २१०० कोटी रुपयाचा निधी लागणार आहे. २२५ किमी लांबीच्या या मार्गावरील रूळ रुंद झाल्यानंतर लांबपल्ल्याच्या गाड्याही या मार्गावरून धावणे शक्य होणार आहे.

* शकुंतला रेल्वे या नावानेही ही रेल्वे पुलगाव - आर्वी, मूर्तिजापूर - यवतमाळ, आणि मूर्तिजापूर - अचलपूर या तीन मार्गावर धावत होती. या २२५ किलोमीटरच्या टप्प्यात अनेक प्रवाशांना सेवा देणाऱ्या या रेल्वेच्या उत्पन्नाचा काही भाग वाटा अगदी आत्तापर्यंत ब्रिटिश सरकारला जात होता.

* गेल्या वर्षी भारत सरकारने या रेल्वेचा ताबा घेत या रेल्वेचा विकास करण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण सुरु केले होते. ही गाडी नॅरोगेज रुळावर चालत होती. त्यामुळे या मार्गावर छोटी गाडी चालणेच शक्य होते. आता या मार्गावर ब्रॉडगेज रूळ टाकण्यात येणार आहे.

* यंदाच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी तरतूद करण्यात आली आहे. खाजगी सार्वजनिक भागीदारी या तत्वावर हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. त्यामुळे २२५ किलोमीटरचा मार्ग रुंद झाल्यावर या मार्गावर लांब पल्ल्याच्या गाड्या चालणे शक्य होणार आहे.

* त्यामुळे हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण झाल्यानंतर विदर्भातील अनेक प्रवाशांना फायदा होणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.