बुधवार, २२ फेब्रुवारी, २०१७

पृथ्वीसारखे सात ग्रह असल्याचा शोध - नासा २३ फेब्रुवारी २०१७

पृथ्वीसारखे सात ग्रह असल्याचा शोध - नासा २३ फेब्रुवारी २०१७

* पृथ्वीसारखा कोणताच ग्रह नसल्याचा आपला भ्रम आता दूर झाला आहे. पृथ्वीसारखे सात ग्रह त्यांच्या सूर्याभोवती फिरत असल्याचा शोध अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाने लावला आहे.

* विशेष म्हणजे या ग्रहावर पाणी आहे आणि म्हणजेच जीवसृष्टीही असण्याची दाट शक्यता आहे. पण या ग्रहावर पोहोचण्यासाठी ४० प्रकाशवर्ष लागतील असेही नासाने म्हटले आहे.

* स्पिट्झर अवकाश दुर्बिणीद्वारे हा शोध लावला असून, सूर्यमालेबाहेर एकाच वेळी एवढ्या संख्येने ग्रह सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

* आपल्याला दिसणाऱ्या सूर्याएवढ्याच आकाराच्या दुसऱ्या सूर्याभोवती हे सात ग्रह फिरतात. त्यावर पाणी आहे. एवढंच नाही सातपैकी तीन ग्रहावर पाणी असण्याची खात्री नासाला आहे. सूर्यमालेबाहेर असल्याने या ग्रहांना एक्सोप्लॅनेट्स असे नाव म्हटले गेले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.