रविवार, १२ फेब्रुवारी, २०१७

अँबेसिडर कारचा ब्रँड प्युजो या फ्रेंच कंपनीला - १३ फेब्रुवारी २०१७

अँबेसिडर कारचा ब्रँड प्युजो या फ्रेंच कंपनीला - १३ फेब्रुवारी २०१७

* एकेकाळी देशाच्या पंतप्रधानापासून ते सर्वसामान्यांची पसंत असलेली अँबेसिडर कार केव्हाच जमा झाली. पण आता या कारचा ब्रॅण्डही भारतीय राहणार नाही. प्युजो ही फ्रेंच कंपनी ८० कोटी रुपयांमध्ये हिंदुस्थान मोटर्सकडून अँबेसिडरचा ब्रँड विकत घेणार आहे.

* सीके बिर्ला समूहातील हिंदुस्थान मोटर्स यांनी प्युजो या कंपनीसोबत ब्रँडचा विक्रीचा करार केला आहे. १९८० च्या दशकात वर्षाला २४ हजार अँबेसिडर कार बनायच्या. २०१३-१४ पर्यंत ही मागणी २५०० पर्यंत घटली.

* तीन वर्षांपूर्वी अँबेसिडर कारचे उत्पादन बंद झाले. ६० ते ९० च्या दशकात अँबेसिडर कारला भरपूर मागणी होती. भारतीयांच्या भावना या कारशी जोडलेल्या होत्या. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.