शनिवार, १८ फेब्रुवारी, २०१७

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना

[ योजनेचा उद्देश ]

* गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता यांना त्यांच्या गरोदर आणि स्तनपान कालावधीमध्ये बुडीत मजुरीपोटी नुकसान भरपाई म्हणून रोख रक्कम देऊन त्यांचे आरोग्य व आहाराचा दर्जा सुधारावा.

[ लाभार्थी ]

* भंडारा आणि अमरावती या दोन जिल्ह्यातील पुढील निकषात बसणाऱ्या महिला.

* १९ वर्षे व त्यापुढील वयाच्या गरोदर महिला त्यांच्या पहिल्या दोन सजीव प्रसूतीपर्यंत.

* सर्व शासकीय व सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी यांना सहवेतन मातृत्व वेतन रजा मिळत असल्यामुळे त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेले आहे.

[ योजनेची कार्यवाही करण्याची प्रक्रिया ]

* गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांची अंगणवाडीत नोंद करून त्यांना खालीलप्रमाणे ३ टप्प्यात ४,००० इतकी रक्कम अदा करण्यात यावी. सदर रक्कम त्यांचे चेक पोस्ट ऑफिस खात्यात जमा करण्यात यावी. ही जबाबदारी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची राहील.

* पहिल्या टप्प्यात रु १५०० इतकी रक्कम, गरोदरपणात नोंदणी करण्याच्या अटीवर, गरोदरपणाचे ६ महिने पूर्ण झाल्यावर बाल विकास प्रकल्प अधिकारी ह्यांनी अंगणवाडी सेविकेमार्फत गरोदर मतांच्या बँक पोस्ट ऑफिस खात्यात जमा करावी.

* दुसऱ्या टप्प्यात रु १५०० इतकी रक्कम बालकाच्या जन्माच्या ३ महिन्यानंतर, बालकांचे लसीकरण झाल्याच्या अटीवर व नियमितपणे स्तनपान होण्याच्या अटीवर बाल विकास प्रकल्प अधिकारी ह्यांनी अंगणवाडी सेविकेमार्फत गरोदर मतांच्या बँक पोस्ट ऑफिस खात्यात जमा करावी.

* तिसऱ्या टप्प्यात रु १०००  इतकी रक्कम बालकाच्या जन्माच्या ३ महिन्यानंतर, बालकांचे लसीकरण झाल्याच्या अटीवर व नियमितपणे स्तनपान होण्याच्या अटीवर बाल विकास प्रकल्प अधिकारी ह्यांनी अंगणवाडी सेविकेमार्फत गरोदर मतांच्या बँक पोस्ट ऑफिस खात्यात जमा करावी.

* अंगणवाडी कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व गरोदर स्त्रिया\स्तनदा मातांची लगेच नोंदणी करावी व त्यांना स्वतःचे बँक खाते\ पोस्ट ऑफिस खाते त्वरित उघडण्यासाठी प्रवृत्त करणे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.