रविवार, १९ फेब्रुवारी, २०१७

यूएईचे मार्स २११७ मिशन योजना सुरु - २० फेब्रुवारी २०१७

यूएईचे मार्स २११७ मिशन योजना सुरु - २० फेब्रुवारी २०१७

* संयुक्त अरब अमिरात [UAE] मंगळ ग्रहावर जीवनासाठी पोषक वातावरण निर्माण करून तेथे मानवी वस्ती स्थापन करण्याचा महत्वाकांक्षी योजनेवर काम सुरु केले आहे.

* शेख मोहंमद बिन रशीद अल मखतुंम यांनी दुबईत या आठवड्याच्या प्रारंभी मार्स २०१७ प्रकल्पाची घोषणा केली. १०० वर्षाच्या या प्रकल्पाअंतर्गत वैज्ञानिक संशोधन केले जाणार असून, युवा पिढीचा अंतराळ विज्ञानाकडील कल वाढावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे.

* मार्स २११७ या प्रकल्पात आंतरराष्ट्रीय पथकाचा समावेश करण्यात येणार आहे. युएईचे शास्त्रज्ञ काम करतील. प्रारंभीच्या काळात अन्न आणि ऊर्जेच्या शक्यता तपासून पाहण्याचे काम करण्यात येणार आहे.

* त्यानंतर मंगळावर पोहोचण्याचा आणि तेथून परतण्याचा सर्वात वेगवान माध्यमांचा दळणवळणाचा शोध घेता येईल.

* मंगळ आणि भारत या मोहिमेअंतर्गत मंगळयान पाठविले होते. हे यान यावेळी पृथ्वीपासून २० कोटी किमी अंतरावर असून ठीकठाक आहे. ४५० कोटी रुपयाचे हे यान १५ महिन्यापासून मंगळ ग्रहाला प्रदक्षिणा घालत असून, आणखी दहा वर्षे ते मंगळाचा अभ्यास करू शकते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.