शनिवार, ११ फेब्रुवारी, २०१७

अमेरिकेत तयार झाली जगातील सर्वात लांब कार - ११ फेब्रुवारी २०१७

अमेरिकेत तयार झाली जगातील सर्वात लांब कार - ११ फेब्रुवारी २०१७

* अमेरिकेत एकाने जगातील सर्वात लांब कार तयार केली आहे. सामान्य कारची लांबी सरासरी १६ फूट असते आणि ती चार चाकावर धावते. परंतु या कारची लांबी ११० फूट असून, तिला तब्बल २४ चाके आहेत. ही कार रस्त्यावर धावताना वेगपणामुळे प्रत्येकाचे लक्ष वेधून घेते.

* कॅलिफोर्नियाचे कस्टम कार गुरु जे आहारबर्ग यांना कारच्या रुपड्यात बदल करून ते अधिक उठावदार करण्याचा छंद आहे. त्यांनीच ही कार तयार केली. द अमेरिकन ड्रीम असे या कारचे नाव आहे.

* जगातील सर्वात लांब लिमोजीन म्हणून ती ओळखली जाते. या कारची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.