गुरुवार, २ फेब्रुवारी, २०१७

देशात रिलायन्स जियोचे नेटवर्क अतिशय जलद - ३ फेब्रुवारी २०१७

देशात रिलायन्स जियोचे नेटवर्क अतिशय जलद - ३ फेब्रुवारी २०१७

* फायनान्शिअल सर्व्हिसेस अँड रिसर्च फर्म क्रेडिट स्विस एक्विटी रिसर्च यांनी वेगवेगळ्या शहरात नेटवर्क मोबाईल साठी केलेल्या सर्वेक्षणात रिलायन्स जियोच नेटवर्क अन्य कंपन्यांच्या तुलनेत खूपच जलद असल्याचं समोर आल आहे.

* या संस्थेने ३० शहरात केलेल्या अभ्यासांती हा निष्कर्ष काढला आहे. सर्वेक्षणानंतर ८०% शहरात रिलायन्स जियो नेटवर्कचे कव्हरेज चांगल आहे.

* तर इतर कंपन्यांचे नेटवर्क कव्हरेज फक्त ३०% शहरात चांगल्या श्रेणीत दाखवण्यात आले आहे. या संस्थेने राज्यांच्या राजधानीसह इतरही शहरात नटवर्क आणि स्पीडचे मूल्यमापन केलं आहे.

* त्यामुळे ४जी नेटवर्क कव्हरेजमध्ये जियो सर्वात प्रगल्भ आणि पुढे असून इतरही कंपन्यांना त्यांच्या श्रेणीत येण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहे.

* ४जी नेटवर्कच्या स्पीडमध्ये एअरटेल सर्वाधिक म्हणजे १२ एमबीपीस स्पीडने पुढे आहे. त्याच्या तुलनेत वोडाफोन, आयडिया आणि रिलायन्स जियो यांचा स्पीड ७ ते ८ एमबीपीएस एवढा आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.