शनिवार, १८ फेब्रुवारी, २०१७

किशोरी शक्ती योजना

किशोरी शक्ती योजना

[ प्रमुख उद्दिष्ट ]

* ११ ते १८ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींचा पोषण व आरोग्य विषयक दर्जा सुधारणे.

* किशोरवयीन मुलींना घरगुती व व्यवसायभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांना अर्थांजनांसाठी सक्षम बनविणे.

* किशोरवयीन मुलींना कुटुंबकल्याण, गृहव्यवस्थापन, बालसंगोपन, व्यक्तिगत आणि परिसर स्वछता, इत्यादी विषयाचे प्रशिक्षण देणे आणि बालविवाहास प्रतिबंध करणे.

* किशोरवयीन मुलींना निर्णयक्षमता वाढविण्यासाठी अनौपचारिक शिक्षण देणे.

[ लाभार्थी निकष आणि निवड ]

* अहमदनगर,  अकोला, अमरावती, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, लातूर, मुंबई, नंदुरबार, नाशिक, परभणी, पुणे, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, ठाणे, यवतमाळ, औरंगाबाद, या जिल्ह्यातील निवडक ग्रामीण व शहरी अशा ४१६ प्रकल्प.

* ११ ते १८ वर्षे वयोगटातील २० किशोरवयीन मुली. [ ६ महिन्याकरिता ]

* १५ ते १८ वर्षे वयोगटातील ०३ किशोरवयीन मुली. [ अंगणवाडीच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी करून घेण्यासाठी ].

* ३ मुली निवडताना दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाती, जमाती, शाळाबाह्य, यांना प्राधान्य.

[ योजनेअंतर्गत मुलींना देण्यात येणाऱ्या सेवा ]

* लोहयुक्त गोळ्या आठवड्यातून एकदा.

* जंतनाशक गोळ्या सहा महिन्यातून एकदा.

* दरमहा वजन घेणे.

* मुलींची रक्त तपासणी करणे.

* निवडलेल्या ३ मुलींचे बीट स्तरावर एकत्रित प्रशिक्षण देणे. या मुलींनी इतर किशोरवयीन मुलींना अंगणवाडी स्तरावर प्रशिक्षण देणे.

* मुख्य सेविकेने तज्ञ यांची मदत घेऊन भाषणे, प्रात्यक्षिक, प्रदर्शन आयोजित करणे.

* मेहंदी काढणे, कचऱ्यातून कला, जैविक शेती, गांडूळ खत, अकॉउंट किपींग, घरगुती विजेच्या उपकरणाची दुरुस्ती, इत्यादी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे.

* शाळाबाह्य मुलींना कार्यरत शिक्षण देऊन पुन्हा शालेय शिक्षणासाठी उद्युक्त करणे.

* निवडलेल्या ३ किशोरवयीन मुलींना पूरक पोषण आहार देणे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.