गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०१७

महाराष्ट्र राज्यात होणार जगातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण व पेट्रोकेमिकल्स प्रकल्प - २४ फेब्रुवारी २०१७

महाराष्ट्र राज्यात होणार जगातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण व पेट्रोकेमिकल्स प्रकल्प - २४ फेब्रुवारी २०१७

* इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तीन सरकारी तेल कंपन्या मिळून उभारणार असलेल्या जगातील सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण व पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील बाभूळवाडी गावाची निवड निश्चित झाली आहे.

* मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा जामनगर, गुजरात येथील ३३ लाख टन वार्षिक क्षमतेचा प्रकल्प जगातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना म्हणून गणला जातो.

* बाबूळवाडी प्रकल्पाची क्षमता याहून सुमारे दुप्पट म्हणजे वार्षिक ६० लाख टन एवढी असेल. या प्रकल्पासाठी सुमारे १.५ लाख कोटी रुपये गुंतवून अपेक्षित असून त्यातुन रोजगाराच्या हजारो संधी उपलब्द होतील.

* सर्व बाबीचा तौलनिक अभ्यास करून रत्नागिरी जिल्ह्यातील बाभूळवाडीची अंतिमतः निवड करण्यात आली. या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम करणाऱ्या इंजिनिअर्स इंडिया लि ने प्रकल्प उभारणीसाठी प्राथमिक अभ्यास व तयारी सुरु केली आहे.

* बाभूळवाडी हे गाव राजापूर तालुक्यातील समुद्र किनाऱ्यापासून सुमारे १५ किमी आत असलेले, अवघ्या ५६४ लोकांचे गाव आहे.

* या गावाजवळ मुख्य तेल शुद्धीकरण कारखाना १४ हजार एकर जागेवर उभारला जाईल. अनुषंगिक साठवणूक टाक्यांचे आवार व बंदराशी निगडित सुविधा जवळच समुद्रकिनारा आणखी एक हजार एकर जागेवर उभारण्याची योजना आहे.

* एकाहून अधिक सरकारी तेल कंपन्यांनी मिळून अशा प्रकारचा महाकाय प्रकल्प उभारण्याची कल्पना पेट्रोलियममंत्री धर्मेश प्रधान यांनी डिसेंबर २०१५ मध्ये सर्वप्रथम मांडली.

* डिसेंबर २०१६ मध्ये इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तीन कंपन्यांनी पेट्रोटेक २०१६ च्या वेळी सामंजस्य करार केला.

* हा प्रकल्प ४० लाख टन व ४० लाख टन अशा २ टप्प्यात उभारण्यात येईल. तिथे आखाती देशातून कच्चे तेल समुद्रमार्गे आणले जाईल.

* भारताची विद्यमान तेल शुद्धीकरण क्षमता २ कोटी ३० लाख टन एवढी आहे. त्यापैकी सरकारी कंपन्यांची क्षमता १.५० कोटी टन तर खाजगी कंपन्यांची ८० लाख टन आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.