रविवार, १२ फेब्रुवारी, २०१७

देशात पहिल्या घर खरेदी करणाऱ्याला सबसिडी मिळणार - १२ फेब्रुवारी २०१७

देशात पहिल्या घर खरेदी करणाऱ्याला सबसिडी मिळणार - १२ फेब्रुवारी २०१७

* जर एखाद्याचे वार्षिक उत्पन्न १८ लाख रुपयांपर्यंत असेल आणि तुम्ही पहिलेच घर खरेदी करणार असाल, तर तुम्हाला २ लाख ४० हजार रुपयाचा फायदा होईल. सरकारने अशा गृहकर्जावर सबसिडी देण्याचे ठरविले आहे. सध्या ६ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांनाच ही सबसिडी दिली जाते. 

* बांधकाम आणि घरखरेदी यांना वेग देण्यासाठी २०२२ सालापर्यंत सर्वांना पक्की घरे उपलब्द करून देण्यासाठी सरकारने आता सबसिडीचे दोन स्लॅब केले आहे. 

* पंतप्रधान मोदी यांनी वार्षिक उत्पन्न ६ लाखापेक्षा कमी असेल, तर ६ लाखांपर्यंतच्या कर्जावर ६.५% सबसिडी दिली जाईल. कर्जाची रक्कम कितीही असली तरीही ६ लाखांपर्यंतच्या कर्जावरच ही सवलत असेल. 

* गृहकर्जाचे व्याज ९% असेल पहिल्या सहा लाखावर २.५% व्याज आकारले जाईल. उरलेल्या रकमेवर मात्र कर्ज घेणाऱ्यांना ९% नेच व्याज द्यावे लागेल. 

* वार्षिक उत्पन्न १२ लाख रुपये असणाऱ्यांना ९ लाखांपर्यंतच्या गृहकर्जावर ४% सबसिडी सरकार देईल. तर १८ लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना १२ लाख रुपयांच्या कर्जावर ३% सबसिडी मिळेल. 

* तिन्ही विभागामध्ये मिळणाऱ्या सबसिडीमुळे २० वर्षे मुदतीच्या कर्जावर किमान २ लाख ४० हजार रुपये इतका फायदा होईल. 

* ही योजना तीन वेगवेगळ्या उत्पन्न गटासाठी आणि केवळ पहिलेच घर खरेदी करणाऱ्यासाठी आहे. त्यात सर्वच उत्पन्न गटातील घर खरेदीकरांना व्याजाच्या रकमेत दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. 

* पंतप्रधान आवास योजनेनुसार केवळ १५ वर्षे मुदतीची गृहकर्जाची मुदत २० वर्षे करण्यात आली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.