शनिवार, १८ फेब्रुवारी, २०१७

एडापद्दी के पालानीस्वामी तामिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री - १९ फेब्रुवारी २०१७

एडापद्दी के पालानीस्वामी तामिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री - १९ फेब्रुवारी २०१७

* सत्ताधारी अण्णाद्रमुकच्या सरचिटणीस व्ही के शशिकला यांनी पक्षावरील पकड घट्ट ठेवत तुरुंगात जाण्यापूर्वी मुख्यमंत्री म्हणून निवडलेल्या एडापद्दी के पालानीस्वामी यांच्या सरकारने तामिळनाडू विधानसभेत रणकदनंतर शनिवारी विश्वासदर्शक ठराव जिंकला.

* तामिळनाडू विधानसभेची एकूण सदस्यसंख्या २३४ आहे. त्यापैकी १३४ आमदार सत्ताधारी अण्णाद्रमुकचे आहेत.

* विधानसभेत गोंधळ घातल्याने द्रमुक या प्रमुख विरोधी पक्षांच्या आमदारांना बखोटयाला धरून सभागृहाद्वारे काढल्यानंतर आणि काँग्रेसने बहिष्कार टाकल्यानंतर घेण्यात आलेल्या मतदानात पालानीस्वामी सरकारच्या बाजूने १२२ तर फक्त विरोधात ११ मते पडली.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.