गुरुवार, २ फेब्रुवारी, २०१७

केंद्रीय अर्थसंकल्प २०१७-१८ तील ठळक मुद्दे - २ फेब्रुवारी २०१७

केंद्रीय अर्थसंकल्प २०१७-१८ तील ठळक मुद्दे - २ फेब्रुवारी २०१७

* देशातील प्रत्येक घटकापर्यंत लाभ पोहोचविण्याचा सरकारचा प्रयत्न.

* जिएसटी प्रणालीमुळे देशाला गती मिळेल.

* जिएसटी संमत झाल्यास समितीचे आभार.

* नोटबंदी हे सरकारचे धाडसी पाऊल, अतिरेकी कारवायासह भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नोटबंदी महत्वाची.

* २०१७ मध्ये विकासाचा दर वाढेल.

* जागतिक मंदीतही भारतात विकासपर्व.

* बँकांची कर्जे स्वस्त करण्याचा प्रयत्न.

* चलन तुटवडा लवकरच संपेल.

* नोटबंदीला महसूल वसुलीला मोठा फायदा.

* तरुणांना रोजगार देण्यावर भर.

* पिकविम्यासाठी ९ हजार कोटीची तरतूद.

* ग्रामविकासासाठी ३ लाख कोटी रुपये खर्च केले जाणार.

* मनरेगासाठी ४८ हजार कोटी रुपयाची तरतूद.

* १ कोटी कुटुंबे गरिबीमुक्त करण्याचा संकल्प.

* ग्रामीण भागात दररोज १३३ किलोमीटर रस्त्याची निर्मिती.

* ग्रामसडक योजनेसाठी १९ हजार कोटीची तरतूद.

* २०१८ पर्यंत प्रत्येक गावात वीज.

* २०१९ पर्यंत एक कोटी लोकांना घर.

* ग्रामीण भागातील विजेसाठी ४५०० कोटी रुपयाची तरतूद.

* तरुणांना ऑनलाईन शिक्षणासाठी स्वयंम योजना सुरु करणार.

* संकल्प प्रकल्पासाठी ६० हजार कोटी, तरुणांना रोजगार प्रशिक्षण.

* ६०० जिल्ह्यामध्ये पीएम कौशल्य केंद्रे.

* गर्भवती महिलांच्या बँक खात्यात ६ हजार रुपये जमा करणार.

* महिला शक्ती केंद्रासाठी ५०० कोटी.

* रेल्वेसाठी १ लाख ३१ हजार कोटीची तरतूद.

* २५ रेल्वे स्थानकावर लिफ्ट आणि सरकते जिने.

* तीर्थस्थळे आणि पर्यटनस्थळे यांच्या क्षेत्रासाठी रेल्वची स्वतंत्र योजना.

* सर्व रेल्वेमध्ये बायोटॉयलेट.

* ई तिकीट खरेदी केल्यास सेवा कर लागणार नाही.

* ३५०० किलोमीटरचा नवीन लोहमार्ग.

* महामार्गासाठी ६४ हजार ९०० कोटी रुपयाचा निधी.

* सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी २ लाख ४१ हजार ३८७ कोटी रुपये.

* पीपीपी मॉडेल वापरून छोट्या शहरांमध्येही विमानतळ सुरु करणार.

* ७ हजार रेल्वे स्थानकावर सौरऊर्जेचा वापर.

* १ कोटी २५ लाख लोकांनी भीम ऍपचा वापर केला.

* आधारकार्डद्वारे आता खरेदी करता येणार, डेबिट कार्डाप्रमाणे वापर शक्य.

* पोस्ट ऑफिस मुख्यालयातून पासपोर्ट मिळणार.

* देशातून पलायन करणाऱ्यांची संपत्ती जप्त करण्यासाठी नवा कायदा आणणार, जेटलींनी माहिती.

* ९९ लाख लोकांनी अडीच लाखाहून कमी संपत्ती दाखवली.

* तीन वर्षात ३.२% वित्तीय तूट.

* ५२ लाख लोकांनी ५ ते १० लाख रुपये उत्पन्न दाखवले.

* २४ लाख लोकांनी १० लाखापेक्षा अधिक उत्पन्न दाखवले.

* केवळ २० लाख व्यापाऱ्यांनी ५ लाख उत्पन्न दाखवले.

* मध्यमवर्गीयांनी करातून सवलत, स्वस्त घराच्या योजनांमध्ये बदल.

* कार्पेट क्षेत्राच्या मर्यादेत सरकारकडून वाढ.

* बिल्टअप क्षेत्र कार्पेट म्हणून गृहीत धरणार.

* ५० कोटीहून अधिक उलाढाल असणाऱ्या कंपन्यांना करात ५% सवलत.

* छोट्या कंपन्यांच्या कार्पोरेट करात कपात करणार.

* राजकीय पक्षांच्या देणग्यांवर टाच, २ हजारापेक्षा अधिक देणगी रोखीने घेता येणार नाही.

* अडीच लाख ते पाच लाख यांच्यापर्यंत उत्पन्नावर ५% कर.

* तीन लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना आता कर लागणार नाही.

* सरकारकडून मोठी करकपात.

* केंद्रीय अर्थमंत्र्यांनी तब्बल १ तास ५५ मिनिटे अर्थसंकल्पीय भाषण केले.

* एक कोटींच्या उत्पन्नावर १५% कर.

* पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर १२ हजार ५०० रुपयांचा फायदा.

* तिन ते साडेतीन लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर २५०० रुपये कर.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.