रविवार, २९ जानेवारी, २०१७

STI पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका - २०१४

STI पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका - २०१४

१] भारतीय नागरी हवाई क्षेत्रात नवीनच आगमन केलेल्या ' एअर एशिया इंडिया ' या कंपनीत कोणत्या भारतीय उद्योग समूहाची गुंतवणूक आहे?
१] अदानी उद्योगसमूह २] टाटा सन्स ३] सहारा इंडिया ४] किंगफिशर उद्योगसमूह

२] खालीलपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहे /आहेत?
१] ३० जून २०१४ रोजी भारताच्या पी एस एल व्ही सी २३ ने चार देशांचे पाच उपग्रह प्रक्षेपित केले.
२] पी एस एल व्ही सी २३ चे वजन २३० टन असून उंची ४४.४ मीटर इतकी आहे.
३] पी एस एल व्ही सी २३ चा खर्च १०० कोटी इतका आहे.
४] प्रक्षेपकाने आजपर्यंत परदेशांचे ३० व भारताचे ३५ उपग्रह प्रक्षेपित केले आहेत.
१] १ आणि २ २] २ केवळ ३] १,२,३ केवळ ४] वरील सर्व

३] खालील विधाने लक्षात घ्या:
१] राज्यसभेत मांडलेले परंतु लोकसभेत न मांडले गेलेले विधेयक, लोकसभा भंग झाल्यास निष्कासित होत नाही.
२] लोकसभेने पारित केलेले परंतु राज्यसभेत न मांडले गेलेले विधेयक, लोकसभा भंग झाल्यास निष्कासित होते.
३] मागील सरकारची बाकी राहिलेली सर्व विधेयके पारित करणे नवीन सरकारला अनिवार्य आहे.
१] फक्त १ आणि २ २] वरील सर्व ३] फक्त ३ ४] फक्त २ आणि ३

४] पुढील विधानापैकी कोणते विधान योग्य आहे?
१] मतदारांना नोटा [NOTA] पर्याय देणारे महाराष्ट्र हे दुसरे राज्य आहे.
२] नुकत्याच झालेल्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील गडचिरोली मतदारसंघात सर्वात जास्त संख्येने नोटा [नन ऑफ द अबोव्ह ] हा पर्याय नोंदविला गेला.
१] केवळ १ २] केवळ २ ३] १ आणि २ ४] १ आणि २ दोन्हीही नाहीत

५] खालील विधाने लक्षात घ्या :
१] उबेर चषक बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे.
२] यात पुरुष व महिला सहभागी होऊ शकतात.
३] या वर्षाचे सुवर्णपदक चीनने पटकाविले.
वरीलपैकी कोणते विधान\कोणती विधाने बरोबर आहेत.
१] १ आणि ३ २] फक्त ३ ३] फक्त १ आणि २ ४] वरील सर्व

६] अंधरप्रदेश पुनर्रचना विधेयकाबाबत कोणते विधान चुकीचे आहे?
१] तेलंगणा हे भारताचे २९ वे राज्य बनेल.
२] तेलंगणामध्ये हैद्राबादसह १० जिल्ह्यांचा समावेश असेल.
३] हैद्राबाद ही दोन्ही राज्यांची पुढील १५ वर्षे संयुक्त राजधानी राहील.
४] वरीलपैकी एकही नाही.

७] ऑस्कर अवॉर्ड्स २०१४ व प्राप्तकर्ते यांची जुळणी करा.
१] सर्वोत्कृष्ट चित्रपट   १] अमेरिकन हसल
२] परकीय भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट  २] १२ इयर्स अ स्लेव्ह
३] सात चषक जिंकणारा चित्रपट ३] द ग्रेट ब्युटी
४] दहा नामांकने प्राप्त चित्रपट ४] ग्रॅव्हिटी
१] २,३,४,१ २] १,२,३,४ ३] ३,४,१,२ ४] ४,१,२,३

८] अपंग स्वयंरोजगारातील स्त्रिया व घटस्फोटित महिलांच्या गरजांची पूर्तता करण्याची महाराष्ट्र शासनाची खालीलपैकी कोणती योजना आहे?
१] प्रतिभा किरण योजना २] स्वयंभू हमी योजना ३] कामधेनू योजना ४] पंचधारा योजना

९] पुढील कोणते \ ती विधाने \ ने योग्य आहे \ त?
१] महोगनी उष्ण कटिबंधीय पानझडी जंगलात आढळतात.
२] सुंद्री किनारवर्ती जंगलात आढळतात.
१] केवळ १ बरोबर २] केवळ २ बरोबर ३] १ आणि २ दोन्ही योग्य ४] १ आणि २ दोन्हीही अयोग्य

१०] पुढील कोणते विधाने योग्य आहेत?
१] संयुक्त अरब अमिरातमध्ये एकूण नऊ अमिराती आहेत.
२] अबूधाबी यातील एक अमिरात नाही.
१] केवळ १ २] केवळ २ ३] केवळ १ आणि २ ४] १ आणि २ दोन्हीही नाहीत.

११] खालील विधाने लक्षात घ्या :
१] पेड न्यूज हे निवडणूक प्रचारातील, निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचे भ्रष्ट कृत्य आहे.
२] पेड न्यूजची प्रकरणे हाताळण्यासाठी निवडणूक आयोगाने ' प्रसारमाध्यम प्रमाणीकरण व निरीक्षण समिती स्थापन केली आहे.
३] लोकप्रतिनिधी कायद्यानुसार पेड न्यूज हा निवडणूक गुन्हा आहे.
वरीलपैकी कोणते विधाने व विधान योग्य आहे?
१] वरील सर्व २] फक्त १ आणि २ ३] फक्त १ ४] फक्त १ आणि ३

१२] पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
१] सबस्टन्स अँड शॅडोज हे नसरुद्दीन शहा यांचे चरित्र आहे.
२] सबस्टन्स अँड शॅडोज हे पुस्तक तारा नायर यांनी लिहिले आहे.
१] केवळ १ २] केवळ २ ३] दोन्ही १ आणि २ ४] १ आणि २ दोन्हीही नाहीत.

१३] खालील विधाने लक्षात घ्या :
१] मिखाईल कलाश्निकोव्ह याने सोविएत युनियन करीता एके ४७ या शास्त्राची रचना केली.
२] या शास्त्राच्या नावातूनच त्याला अमरत्व प्राप्त झाले.
३] वयाच्या ९४ व्या वर्षी तो मरण पावला.
४] हे शास्त्र वालुकामय तसेच आद्र परिस्थितीत वापरता येते.
१] फक्त १ २] फक्त १ आणि २ ३] फक्त ३ आणि ४ ४] वरील सर्व

१४] ' एफ डी ए ' आदेशानुसार डॉक्तरांनी द्यावयाच्या औषधचिट्ठी संबंधात खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
१] औषधचिट्ठी A-५ आकाराच्या कागदावर द्यावी.
२] त्यावर डॉक्टरांचे पूर्ण नाव, शैक्षणिक अहर्ता व नोंदणी क्रमांक असावा.
३] डॉक्टरांनी जेनेरिक औषधांना प्राधान्य द्यावे.
४] औषधचिट्ठी मोठ्या अक्षरात [कॅपिटल लेटर्स] असावी.
१] केवळ १ २] केवळ १ आणि २ ३] १, २, ३ ४] वरील सर्व

१५] १] BICEP २ खगोलीय दुर्बिणीच्या वापराने खगोलशात्र संशोधकांनी अंतराळ विस्ताराच्या सिद्धांतावर शिक्कामोर्तब केले. २] अंतराळ विस्तार सिद्धांतानुसार विश्वाच्या उत्पत्तीनंतर विश्व प्रसरण पावले.
३] BICEP २ ने गुरुत्वाकर्षण लहरी शोधल्या.
वरील कोणती विधाने बरोबर आहेत.
१] फक्त १ २] फक्त १ आणि २ ३] वरील सर्व ४] वरीलपैकी एकही नाही

१६] कोणत्या राजकीय पक्षांचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते?
१] कृषक प्रजा पक्ष २] शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन ३] कम्युनिस्ट पक्ष ४] अपक्ष
१] १,३,४ २] २,३,४ ३] १,२,४ ४] १,२,३

१७] खालील विधाने लक्षात घ्या.
१] संविधानाच्या १६५ व्या कलमानुसार राज्याच्या महाधिवक्त्याची तरतूद करण्यात आली होती.
२] महाधिवक्त्याची नियुक्ती राष्ट्रपती करतात.
३] त्याला राज्याच्या विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेण्याचा व मत मांडण्याचा अधिकार आहे.
४] तो राज्यशासनाचा सर्वोच्च कायदेविषयक सल्लागार आहे.
वरील विधाने बरोबर आहेत ते सांगा?
१] १ आणि २ २] २ आणि ३ ३] ३ आणि ४ ४] १,३,आणि ४

१८] १] सर्वसाधारणपणे ग्रामपंचायतच्या एकूण १७ विषय समित्या आहेत.
२] वर्षातून ग्रामपंचायतच्या एकूण ६ सभा अनिवार्य असतात.
१] फक्त १ २] फक्त २ ३] फक्त ३ ४] १ आणि २ दोन्ही नाहीत

१९] जोड्या लावा [ राज्य व त्या बाबतच्या विशेष तरतुदी ]
१] नागालँड                १] ३७१-H
२] सिक्कीम               २] ३७१-G
३] मिझोराम               ३] ३७१-F
४] अरुणाचल प्रदेश     ४] ३७१-C
१] ४,३,२,१ २] ४,२,३,१ ३] १,२,३,४ ४] १,३,२,४

२०] राष्ट्रपती व पंतप्रधान ह्यांच्यातील संबंध भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणत्या कलमांने विस्तृतपणे अधिराज्यित होतात?
१] कलम ७३ २] कलम ७४ ३] कलम ७६ ४] कलम ७८

२१] खालील विधाने लक्षात घ्या:
१] स्वर्ण सिंह समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश संविधानात करण्यात आला आहे.
२] मूलभूत कर्तव्ये फक्त भारतीय नागरिकांनाच लागू आहेत.
३] केशवानंद भारती केस मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे.
वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ते सांगा.
१] १,२ २] २,३ ३] १,३

२२] पुढील प्रश्नाचे उत्तर सांगा? प्रश्न - M चा भाऊ कोण आहे? विधाने १] - M हा N चा भाऊ आहे. २] M चे वडील, N च्या आईचे पती आहेत.
१] फक्त १ मधील माहिती पुरेशी आहे.
२] फक्त विधान २ मधील माहिती पुरेशी
३] विधाने १ आणि २ मधील माहिती एकत्रित आवश्यक
४] विधाने १ आणि २ मधील माहिती एकत्रित ही पुरेशी नाही.

२३] खालील विधाने लक्षात घ्या:
१] भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग असून त्यामध्ये ३६८ व्या कलमानुसार दुरुस्ती करता येते.
२] भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका संविधानाचा भाग नाही आणि त्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही.
३] उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग आहे आणि त्यामध्ये संविधानाच्या '' मौलिक संरचनेला '' धक्का न लावता दुरुस्ती करता येते.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे?
१] फक्त १ २] फक्त १ आणि २ ३] फक्त ३ ४] फक्त १ आणि ३

२४] पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे.
१] कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ या दक्षिणी राज्यांपैकी केवळ दोन राज्यात विधान परिषद आहे.
२] विधान परिषदेत कमीत कमी ६० सदस्य असू शकतात.
१] केवळ १ २] केवळ २ ३] १ आणि २ ४] १ आणि २ दोन्ही नाहीत

२५] स्वातंत्र्याबरोबर काळात भारत सरकारने भारतीय रुपयांचे अवमूल्यन कधी केले नाही?
१] १९४१ २] १९६६ ३] १९७६ ४] १९९१

२६] पुढील कोणते विधान अयोग्य आहे?
१] पाकिस्तान सरकारला निझामने ८०० लक्ष रुपये दिले होते.
२] जिन्हांच्या मदतीने पोर्तुगीज यांच्याकडून गोवा बंदर वापरण्याची परवानगी हवी होती.
३] निझामने एका पाकिस्तानची त्याच्या मुख्यमंत्रीपदी नेमणूक केली.
१] १ २] २ ३] ३ ४] एकही नाही

२७] इ स १८७५ च्या शेतकरी उठावासंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे.
१] १२ मे १८७५ रोजी सुपे येथे शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला.
२] १५ जून १८७५ रोजी शेवटचा उठाव भीमथडीमधील मुधली गावात झाला.
३] प्रो रणजित गुहांनी Myth of the deccan riots या लेखात शेतकरी उठावाची चर्चा केली आहे.
४] वरील एकही नाही.

२८] भारतासंदर्भात वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे ' चांदोबाची मागणी ' असा उल्लेख कोणी केला?
१] भारतमंत्री - मोर्ले २] व्हाइसरॉय - मिंटो ३] भारतमंत्री - मॉन्टेग्यु ४] व्हाइसरॉय - चेम्सफर्ड

२९] खालील दुष्काळ आयोगाची त्यांच्या नियुक्ती वर्षानुसार कालानुक्रमाने रचना करा व योग्य पर्याय निवडा.
१] मक्डोनाल्ड आयोग २] लायल आयोग ३] कॅम्पबेल आयोग ४] स्ट्राची अयोग

३०] खालीलपैकी कोणत्या काळात प्रांतिक स्वायत्तता कार्यरत होती?
१] १८३५-१९३९ २] १८३५-१९३७ ३] १९३७-१९३९ ४] १९३९-१९४५

३१] योग्य जोड्या लावा
१] लॉर्ड बेटिंक            १] ग्रँड टॅंक रोड
२] लॉर्ड डलहौसी        २] सार्वजनिक बांधकाम खाते
३] बॅ मुकुंदराव जयकर ३] इंडियन रोड डेव्हलोपमेन्ट कमिटी
४] श्री वालचंद हिराचंद ४] हिंदुस्थान एअरक्राफ्ट लिमिटेड
१] २,३,४,१ २] १,२,३,४ ३] ४,३,२,१ ४] ३,४,१,२

३२] पुढील कोणते विधान योग्य आहे?
१] काँग्रेसच्या १८८८ च्या अलाहाबाद अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविणारा आद्य इंग्रज होता - जॉर्ज यूल.
२] सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी सर्वप्रथम अधिवेशनाचे अध्यक्षपद मुंबई येथे भूषविले
१] केवळ १ बरोबर २] केवळ २ बरोबर ३] १ आणि २ बरोबर ४] १ आणि २ अयोग्य

३३] जोड्या जुळवा:
१] महाराष्ट्राचे परिषदेचे पहिले अधिवेशन  १] श्रीधर वामन नाईक
२] महाराष्ट्र परिषदेचे दुसरे अधिवेशन      २] काशिनाथ वैद्य
३] महाराष्ट्र परिषदेचे तिसरे अधिवेशन    ३] बॅरिस्टर श्रीनिवास शर्मा
४] महाराष्ट्र परिषदेचे चौथे अधिवेशन      ४] गोविंदराव नानल
१] २,३,४,१ २] ४,३,२,१ ३] ३,४,१,२ ४] १,२,३,४

३४] हिंदू व मुसलमानांचा सुंदर वधूचे [भारत] दोन डोळे अशी उपमा कोणी दिली?
१] जवाहरलाल नेहरू २] मुहम्मद इकबाल ३] सय्यद अहमदखा ४] महात्मा गांधी

३५] रॉयल इंडियन नेव्ही च्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी १८ फेब्रुवारी १९४६ रोजी संप पुकारावा व तो त्यांनी कोठे पुकारला?
१] हिंदुस्थान/कलकत्ता २] तलवार/मुंबई ३] शिवनेरी/पुणे ४] सह्यांद्री/पोरबंदर

३६] पुढील विधानापैकी कोणते विधान योग्य आहे?
१] भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात ७३ प्रतिनिधी उपस्थित होते.
२] सर ए ओ ह्योम यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सेफ्टी व्हॉल्व म्हणून कार्य करावयास सांगितले.
१] केवळ १ २] केवळ २ ३] १ आणि २ दोन्ही ४] १ आणि २ दोन्ही नाही

३७] मध्यवर्ती प्रांत व बेरार पर्यंत होमरूल चळवळ पोहोचविण्याचे काम अनेकांनी केले.
१] खापर्डे यांनी यवतमाळ येथे शाखा स्थापन केली.
२] अणे यांनी अमरावती जवळ शाखा उघडली.
३] मुंजे यांनी नागपूर शाखा स्थापन केली.
वरील कोणते विधान योग्य आहे.
१] १ २] २ ३] ३ ४] वरील सर्व

३८] खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा?
१] लॉर्ड कॅनिंग - राज उपाधी कायदा २] लॉर्ड लिटन - भारतीय शस्त्र कायदा ३] लॉर्ड रिपन - प्रथम फॅक्ट्री कायदा ४] लॉर्ड कर्झन - भारतीय विद्यापीठ कायदा

३९] पुढीलपैकी अचूक जोडी ओळखा?
१] वॉरन हेस्टिंग्ज - लिलाव पद्धतीने महसूल गोळा
२] लॉर्ड कॉर्नवालिस - कायमधारा पद्धत बंगाल
३] थॉमस माल्थस - रयतवारी पद्धतीचे पुरस्कर्ते
४] रॉबर्ट कीथ प्रिंगेल - डेव्हिड रिकार्डोचा शिष्य
१] १ बरोबर २] २ बरोबर ३] १,३४ बरोबर ४] सर्व पर्याय बरोबर

४०] पुढील विधानापैकी कोणते योग्य आहे?
१] राष्ट्रीय काँग्रेस संघटनेला सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग असे लॉर्ड कर्झन यांनी म्हटले.
२] सण १८१८ मध्ये काँग्रेस अधिवेशनाला जागा मिळू नये असे प्रयत्न गव्हर्नर जनरल डफरीन यांनी केले.
१] केवळ १ बरोबर २] केवळ २ बरोबर ३] १ आणि २ बरोबर ४] १ आणि २ चूक

४१] खालील विधानापैकी चुकीचे विधान कोणते?
१] महाराष्ट्रात सर्वात जास्त तांदळाचे उत्पादन रायगड जिल्ह्यात होते.
२] कोकणात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे गहू पिकविला जात नाही.
३] भारतात सर्वात जास्त केळी उत्पादन महाराष्ट्रात होते.
४] महाराष्ट्रात खरीप पिकांचे सर्वात कमी क्षेत्र अकोला - वाशीम जिल्ह्यात आहे.
१] फक्त १ २] फक्त ४ ३] फक्त १,२,३ ४] फक्त २,३,४

४२] पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे?
१] सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील राज्यातील एकूण लोकसंख्येच्या ४५.२% लोकसंख्या नागरी भागात राहते.
२] सन २००१ मध्ये हे प्रमाण ४२.४% होते.
१] केवळ १ बरोबर २] केवळ २ बरोबर ३] १ आणि २ योग्य ४] १ आणि २ चूक

४३] लोकखनिजांत असलेल्या लोहाच्या प्रमाणावरून लोहखनिजाचे उच्च प्रतीकडून कमी प्रतीकडे क्रम लावा.
१] हेमेटाइड २] सिडेराइड ३] मॅग्नेटाइड ४] लिमोनाइट

४४] खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा आहेत?
१] गोदावरी २] भीमा ३] कृष्णा ४] वरीलपैकी एकही नाही

४५] खालील विधाने भारतातील हिवाळ्यातील हवामानाची स्थिती वर्णन करतात.
१] उत्तर भारतात कमी तापमान असते.
२] उत्तर भारतात उच्च दाब असलेला विभाग असतो.
३] हवेचा दाब उत्तरेकडे कमी होत जातो.
४] वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात.
खालील कोणती विधाने बरोबर ते सांगा?
१] १ २ ३ बरोबर २] १, ३, ४ बरोबर ३] १,२,४ बरोबर ४] फक्त ३ बरोबर

४६] पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
१] डोलोमाइट हा खडक महाराष्ट्राच्या कडाप्पा प्रणाली मध्ये सापडतो.
२] चुनखडी खडक महाराष्ट्राच्या धारवाड प्रणालीत आढळतो.
१] केवळ १ २] केवळ २ ३] १ आणि २ बरोबर ४] १ व २ दोन्ही चूक

४७] पुढीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत ते सांगा?
१] रत्नागिरी जिल्ह्यात नारळ संशोधन केंद्र हर्णे येथे आहे.
२] दापोलीला रत्नागिरी जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हणतात.
१] केवळ १ २] केवळ २ ३] दोन्ही १ आणि २ ४] १ आणि २ चूक

४८] महाराष्ट्रातील सिंचन क्षेत्रानुसार पुढील सिंचन स्रोत उतरत्या क्रमाने लावा?
१] सरकारी कालवे २] खाजगी कालवे ३] विहिरी ४] तलाव
१] १,२,३,४ २] ३,१,४,२ ३] ३,१,२,४ ४] ३,२,१,४

४९] उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील गाळाच्या संचयनाच्या खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे.?
१] तराई, खादर, भांगर २] तराई, भांगर,तराई ३] खादर, भांगर, तराई ४] भांगर, तराई, खादर

५०] पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहेत ते सांगा?
१] मालवण जवळील खांदेरी बेटावर सिंधदुर्ग हा किल्ला आहे.
२] एलिफंटा लेणी उंदेरी बेटावर आढळतात.
१] केवळ १ योग्य २] केवळ २ ३] १ आणि २ बरोबर ४] १ आणि २ बरोबर

५१] महाराष्ट्रातील मोसमी वनातील वृक्षांची पाने उन्हाळ्यात गळून पडतात कारण :
१] उन्हाळ्यात पाऊस पडत नाही.
२] उन्हळ्यात तापमान जास्त असते.
३] उन्हाळयात हवामान विषम असते.
४] बाष्पीभवन कमी कारणास्तव

५२] गोदावरी नदीला वृद्ध गंगा म्हणतात कारण :
१] गोदावरी नदीच्या विस्तृत आकार व विस्तारामुळे.
२] गोदावरी नदी भारतातील जुनी नदी असल्यामुळे.
३] गोदावरी नदीची लांबी गंगा नदीएवढी असल्यामुळे.
४] गोदावरी नदीच्या काठावर अनेक तीर्थस्थान असल्यामुळे.

५३] पुढील कोणते विधान योग्य आहेत ते सांगा?
१] सहस्त्रकुंड धबधबा वैनगंगा नदीवर आहे.
२] वणी हे गाव निरगुडा नदीवर वसलेले आहे.
१] फक्त १ २] फक्त २ ३] १ आणि २ बरोबर ४] १ आणि २ चूक

५४] उत्तरेकडे दक्षिणेकडे, रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे?
१] सावित्री, भारजा, जोग, वशिष्टी २] वाशिष्टी, जोग, भारजा, सावित्री ३] जोग, भारजा, वाशिष्टी, सावित्री ४] सावित्री, वाशिष्टी, जोग, भारजा

५५] सिंधुदुर्ग आणि रत्नगिरी जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण अधिक आहे कारण:
१] हे क्षेत्र स्त्रियांच्या वाढीसाठी अधिक पोषक आहे.
२] स्त्रियांचा जन्मदर पुरुषापेक्षा अधिक आहे.
३] या जिल्ह्यातील पुरुषांनी स्थलांतर केले आहे.
४] या जिल्ह्यामध्ये - पुरुषांचा मृत्युदर स्त्रियांपेक्षा जास्त आहे.

५६] UNDP च्या २०१३ अहवालात प्रसिद्ध झालेल्या मानव विकास निर्देशांकानुसार [HDI] पुढील देशांची उतरत्या क्रमाने मांडणी करा.
१] दक्षिण कोरिया २] जपान ३] अमेरिका ४] नॉर्वे
१] १,२,३,४ २] ३,४,२,१ ३] २,१,३,४ ४] ४,३,२,१

५७] पुढीलपैकी विधानापैकी कोणते विधान योग्य आहे?
१] भारतातील दुसरा सर्वात मोठा उद्योग म्हणजे कापड उद्योग होय.
२] देशाच्या निर्यात मिळकतीच्या सुमारे ११% मिळकत या उद्योगातून होते.
१] १ २] २ ३] १ आणि २ ४] १ आणि २ दोन्ही चूक

५८] राष्ट्रीय लोकसंख्या धोरण २००० ची उद्दिष्ट्ये आहेत?
१] माता मृत्यूदर प्रति लाख जन्मास १०० पेक्षा खाली आणणे.
२] सार्वत्रिक लसीकरण
३] बाल मृत्युदर प्रति हजार जन्मास २० पेक्षा खाली आणणे.
१] फक्त १ २] १ आणि २ ३] १ आणि ३ फक्त ४] वरील सर्व

५९] १] उच्च उत्पादकता प्रजाती कार्यक्रम १९६६ मध्ये सुरु करण्यात आला.
२] उच्च उत्पादकता प्रजाती कार्यक्रम हा फक्त गहू आणि तांदूळ यापुरताच मर्यादित होता.
१] फक्त १ बरोबर २] फक्त २ बरोबर ३] १ आणि २ बरोबर ४] १ आणि २ चूक

६०] १] क्षेत्रीय ग्रामीण बँका या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेकडून पुरस्कृत केल्या जातात.
२] एम नरसिंहम हे ग्रामीण बँकांविषयक कार्यगटाचे प्रमुख होते.
१] फक्त १ बरोबर २] फक्त २ बरोबर ३] १ आणि २ बरोबर ४] १ आणि २ चूक

६१] १] तेरावा वित्त आयोग श्री विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला. 
२] तेराव्या वित्त आयोगाचा कालावधी २०१०-१५ आहे. 
३] राज्यघटनेच्या कलम २७८ नुसार वित्त आयोग स्थापन केला जातो. 
१] १ आणि २ बरोबर २] २ आणि ३ बरोबर ३] १,२,३ बरोबर ४] १,२,३ सर्व चूक 

६२] पुढील कोणते विधान योग्य आहे?
१] राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन [NRHM] २००५ वर्षी सुरु करण्यात आले. 
२] सप्टेंबर २०१२ पावेतो सुमारे ८८,००० अशांना निवडून प्रशिक्षित करण्यात आले. 
१] फक्त १ बरोबर २] फक्त २ बरोबर ३] १ आणि २ बरोबर ४] १ आणि २ चूक 

६३] पुढील कोणते विधान चूकीची  आहे?
१] सन १९६९ मध्ये १९ बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले?
२] ज्या व्यापारी बँकांचे डिपॉझिट्स रुपये ५० कोटी चे वर होते त्यांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.


१] फक्त १ बरोबर २] फक्त २ बरोबर ३] १ आणि २ बरोबर ४] १ आणि २ चूक 

६४] पुढील विधानापैकी कोणते कोणते योग्य आहे?
१] अग्रणी बँक योजना १९५९ मध्ये सुरु करण्यात आली.
२] वित्त पुरवठ्याकरिता प्रादेशिक स्तरावरील पुरवठ्याची गरज लक्षात घेऊन अग्रणी बँक योजना सुरु करण्यात आली.


१] फक्त १ बरोबर २] फक्त २ बरोबर ३] १ आणि २ बरोबर ४] १ आणि २ चूक 

६५] पुढील कोणते विधान योग्य आहे?
१] स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने राष्ट्रीय उत्पन्न समिती ऑगस्ट ४८ मध्ये नेमली.
२] प्रोफेसर डी आर गाडगीळ हे तिचे अध्यक्ष होते.


१] फक्त १ बरोबर २] फक्त २ बरोबर ३] १ आणि २ बरोबर ४] १ आणि २ चूक 

६६] पुढील कोणते विधान योग्य आहेत?
१] एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम २ ऑकटोम्बर १९८० रोजी ६०११ घटकात सुरु करण्यात आला.
२] प्रत्येक घटकात ६०० गरीब कुटुंबाना १९८० - ८५ मध्ये मदत पुरवायची होती.
१] फक्त १ बरोबर २] फक्त २ बरोबर ३] १ आणि २ बरोबर ४] १ आणि २ चूक

६७] पुढील कोणते विधान योग्य आहे?
१] राष्ट्रीय उत्पन्न मोजमापात सध्या केंद्रीय सांख्यिकी संस्था २००५-०६ चा आधारभूत वर्ष म्हणून वापर करते.
२] पूर्वी २०००-०१ आधारभूत वर्ष होते.
१] फक्त १ बरोबर २] फक्त २ बरोबर ३] १ आणि २ बरोबर ४] १ आणि २ चूक

६८] पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
१] २००५ च्या सेझच्या कायद्यातील तरतुदीनुसार विशेष आर्थिक क्षेत्र आणि स्वयंचलित मार्गानुसार १००% विदेशी गुंतवणुकीस परवानगी देण्यात आली आहे.
२] देशात ३३०८ विशेष आर्थिक क्षेत्र माल व सेवांची निर्यात करतात.
१] फक्त १ बरोबर २] फक्त २ बरोबर ३] १ आणि २ बरोबर ४] १ आणि २ चूक

६९] पुढील कोणते विधान योग्य आहे?
१] जागतिक व्यापार संघटनेची व्यापार वाटाघाटींची दोहा फेरी २००२ या वर्षी सुरु झाली.
२] ह्या वाटाघाटी सन २०११ पर्यंत ही पूर्ण झालेल्या नव्हत्या.
१] फक्त १ बरोबर २] फक्त २ बरोबर ३] १ आणि २ बरोबर ४] १ आणि २ चूक

७०] १] महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना हमी योजना २००६ मध्ये सुरु करण्यात आली.
२] या योजनेत ग्रामीण युवकांना स्व रोजगाराचे प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे.
१] फक्त १ बरोबर २] फक्त २ बरोबर ३] १ आणि २ बरोबर ४] १ आणि २ चूक

७१] डोळ्यांची व कॅमेऱ्यांची रचना यात साम्य असते. या संदर्भात पुढील दोन विधाने पहा.
१] बुबुळातील बाहुली भिंगाचे छिद्र व झडपेचे कार्य करते.
२] भिंगाचे स्नायू सिलिंडरी स्नायू अंतर बदलण्याची व्यवस्था पहाते.
१] फक्त १ बरोबर २] फक्त २ बरोबर ३] १ आणि २ बरोबर ४] १ आणि २ चूक

७२] पुढील कोणते विधान योग्य आहे.
१] लाल रंगाचा विचलन कोण सर्वाधिक असतो.
२] जांभळ्या रंगाच्या प्रकाशाची तरंग लांबी सर्वाधिक असते.
१] फक्त १ बरोबर २] फक्त २ बरोबर ३] १ आणि २ बरोबर ४] १ आणि २ चूक

७३] विद्युत परिपथावरील वितळतार :
१] उपकरणाशी एकसर जोडणीत जोडतात.
२] उपकरणाशी समांतर जोडणीत जोडतात.
३] मिश्रधातूंपासून बनवलेली असते.
४] शुद्ध धातूपासून बनवलेली असते.
१] १ आणि ३ २] २ आणि ३ ३] २ आणि ४ ४] १ आणि ४

७४] पुढील कोणते विधान योग्य आहे?
१] अल्युमिनियम चा धातुपाषाण AL २ O३ आहे
२] सायडेराइट हा ऍल्युमिनिअमचा खनिज क्षार आहे.
१] फक्त १ बरोबर २] फक्त २ बरोबर ३] १ आणि २ बरोबर ४] १ आणि २ चूक

७५] ड्युरॅल्युमिन हे मिश्रधातू कोणत्या धातूपासून तयार होते.
१] Al,Cu, Mn, Mg, Zn २] Al,Cu, Ca, Mn, Zn ३] Al, Cu, Ni, Sn, Zn ४] Al, Cu, Mg, Ca, Zn

७६] उत्प्रेरक रासायनिक अभिक्रियांचा वेग या परिस्थितीत वाढवितो.
१] जेव्हा उत्प्रेरकाची सयोजना बदलते
२] जेव्हा रासायनिक अभिक्रियेची सक्रियन ऊर्जा वाढते.
३] जेव्हा रासायनिक अभिक्रियेची सक्रियन ऊर्जा कमी होते.
४] जेव्हा रासायनिक अभिक्रियेची उष्णता वाढते.

७७] पुढील दोन विधानापैकी कोणते विधान योग्य आहे?
१] सिल्व्हर फिश प्राणी मत्स्यवर्गात येतो.
२] कुत्र्याचे जास्तीत जास्त आयुर्मान १५ वर्षे असते.
१] फक्त १ बरोबर २] फक्त २ बरोबर ३] १ आणि २ बरोबर ४] १ आणि २ चूक

७८] पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे. 
१] मासे या प्राणिवर्गात प्रकाशाचे ज्ञानेंद्रिय सर्वात कमी विकसित असते. 
२] सर्पांमध्ये चार कप्पी हृदय नसते. 
१] फक्त १ बरोबर २] फक्त २ बरोबर ३] १ आणि २ बरोबर ४] १ आणि २ चूक

७९] द्विपाद नामपद्धतीच्या नियमावलीप्रमाणे खालील कोणती पद्धत चुकीची आहे?
१] द्विपाद नाम तिरके मुद्राक्षरा प्रमाणे लिहितात. 
२] जातीवाचक व जातिवर्गनाम ह्या दोन्ही नामांची सुरवात मोठ्या लिपीच्या अक्षराने करतात. 
३] जातीवाचकनामानंतर जातीवर्गनाम येते. 
४] द्विपाद पद्धतीत जातिवर्गनाम येते. 

८०] खालील कोणत्या प्रकारचे फुल हे सपुष्प वनस्पतीमध्ये प्रगतीशीलतेचे प्रतीक मानले जाते?
१] एकांटे फुल २] नियमित प्रकारचे फुल ३] अनियमित प्रकारचे फुल ४] द्विलिंगी प्रकारचे फुल 

८१] पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
१] सियानोफायटा शेवाळ वर्गास '' निळे - हिरवे '' शेवाळ असे संबोधतात जाते?
२] बॅक्ट्रोस्परमम शेवाळ नत्र स्थिरीकरण करते. 
१] फक्त १ बरोबर २] फक्त २ बरोबर ३] १ आणि २ बरोबर ४] १ आणि २ चूक

८२] पुढील कोणते विधान योग्य आहे?
१] तांदळावरील खैऱ्या रोग जस्त खनिजद्रव्याच्या अभावामुळे होतो. 
२] पावडरी माईल्ड हा गव्हावरील रोग जमिनीवरील पालाशच्या अभावामुळे होते. 
१] फक्त १ बरोबर २] फक्त २ बरोबर ३] १ आणि २ बरोबर ४] १ आणि २ चूक

८३] शाकाहारी मेदामध्ये - - - - - असते. व ते खोलीच्या तापमानाला - - - - असते. 
१] असंतृप्त मेद व आम्ल, द्रव २] संतृप्त मेद व आम्ल, द्रव ३] असंतृप्त मेद आम्ल,घन ४] संतृप्त मेद आम्ल, घन 

८४] भारतीय आहारात व्हिटॅमिन - ए जीवनसत्व हे मुख्यत्वे - - - - - पासून मिळते. 
१] फायटिन २] टॅनिन ३] ऑक्सिटोसीन ४] कॅटोरीन 

८५] पुढील कोणते विधान योग्य आहे?
१] पांढऱ्या रक्तपेशी अस्थीमध्यात बनतात. 
२] पांढऱ्या पेशी जीवाणूंना बॅक्टेरिया संपवतात. 
१] फक्त १ बरोबर २] फक्त २ बरोबर ३] १ आणि २ बरोबर ४] १ आणि २ चूक


उत्तरे - १] २, २] ३, ३] १, ४] २, ५] १, ६] ३, ७] १, ८] ३, ९] २, १०] ४, ११] २, १२] ४, १३] ४, १४] ४, १५] २, १६] ४, १७] ४, १८] प्रश्न रद्द , १९] प्रश्न रद्द, २०] ४, २१] १, २२] ४, २३] ४, २४] १, २५] ३, २६] १, २७] ३, २८] १, २९] २, ३०] ३, ३१] २, ३२] १, ३३] २, ३४] ३, ३५] २, ३६] २, ३७] ३, ३८] १, ३९] ४, ४०] ४, ४१] प्रश्न रद्द ४२] ३, ४३] २, ४४] २, ४५] ३, ४६] ४, ४७] २, ४८] २, ४९] २, ५०] ४, ५१] ४, ५२] प्रश्न रद्द ५३] २, ५४] १, ५५] ३, ५६] ४, ५७] ३, ५८] २, ५९] १, ६०] ३, ६१] १, ६२] १, ६३] १, ६४] २, ६५] ४, ६६] २, ६७] ४, ६८] १, ६९] २, ७०] २, ७१] ३, ७२] ४, ७३] १, ७४] ४, ७५] प्रश्न रद्द ७६] ३, ७७] ४, ७८] २, ७९] २, ८०] ३, ८१] १, ८२] १, ८३] १, ८४] ४, ८५] ३. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.