मंगळवार, १० जानेवारी, २०१७

STI पूर्व परीक्षा सराव प्रश्नपत्रिका - २०१५

MPSC - STI पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका - २०१५

१] डिसेंबर २०१५ मध्ये सौदी अरेबिया मध्ये झालेल्या - - - - - निवडणुकांमध्ये प्रथमच प्रौढ सौदी अरेबियन स्त्रियांना मतदान करू देण्यात आले?
१] शूरा परिषद २] नगरपालीका ३] राष्ट्रीय ४] प्रादेशिक

२] परमहंस सभेची पुढीलपैकी कोणती उद्दिष्ट्ये होती?
१] जातीसंस्था नष्ट करणे २] स्त्री शिक्षणाला उत्तेजन देणे ३] पुनर्विकासास प्रेरित करणे ४] मूर्तिपूजा करण्यास उत्तेजन देणे
१] १,२,३ फक्त २] २ फक्त ३] ३ फक्त ४] ४ फक्त

३] केशवराव भोसले आणि बालगंधर्व यांनी [ संगीताचा मानापमान ] नाटकाचा प्रयोग करून - - - - - - च्या मदतीसाठी रुपये पंधरा हजार जमविले?
१] दुष्काळ निवारण फंड २] टिळक स्वराज्य फंड ३] दोस्तांचे महायुद्धातील प्रयत्न ४] वरीलपैकी नाही

४] पुढील कोणाला फ्रेंच सरकारचा [ लिजेंड ऑफ ऑनर ] हा पुरस्कार प्राप्त झाला आहे?
१] शक्ती बर्मन २] पंडित रविशंकर ३] सत्यजित रॉय ४] एम एफ हुसेन
१] फक्त १,२,३ २] फक्त २,३,४ ३] फक्त १,२,४ ४] फक्त १, ३, ४

५] अलीकडेच कोणत्या उच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आणि जमातीना देण्यात येणारे सरकारी नोकऱ्यांमधील बढतीबद्दल आरक्षण रद्द केले?
१] भोपाळ २] चेन्नई ३] कलकत्ता ४] मुंबई

६] खालील विधाने विचारात घ्या:
१] भारताने २०१५ मध्ये जगात सर्वाधिक भात निर्यात करण्याच्या बाबतीत थायलंडवर मात केली आहे.
२] भारताने २०१५ मध्ये १०.२३ दशलक्ष टन भाताची निर्यात केली आहे.
३] व्हिएतनाम हा भात निर्यात करणारा ३ मोठा देश आहे.
४] चीन हा भात आयात करणारा प्रथम क्रमांकाचा देश आहे.
१] १ आणि ३ २] १ आणि २ ३] ३ आणि ४ ४] वरील सर्व

७] युनेस्कोच्या मते शैशव म्हणजे जन्मापासून - - - - - - वर्षापर्यंतचा काळ, ज्या काळात मेंदूची लक्षणीय वाढ होते आणि भविष्यातील शिकण्याचा आणि विकासाचा पाया रचला जातो?
१] दहा २] सहा ३] आठ ४] नऊ

८] मेक इन इंडिया साप्ताहाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
१] त्याचे आयोजन मुंबईमध्ये १३ ते १८ फेब्रुवारी २०१६ दरम्यान केले गेले?
२] स्वीडन आणि फिनलंड देशाचे पंतप्रधान उदघाटन सोहळ्यास उपस्थित होते?
१] केवळ १ २] केवळ २ ३] दोन्ही ४] एकही नाही

९] ६३ व्या राष्ट्रीय चित्रपटाबाबत पुरस्काराबाबत खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे?
१] सर्वोत्कृष्ट चित्रपट - बजरंगी भाईजान
२] सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - दम लगा के हैशा
३] सर्वोत्कृष्ट मनोरंजक चित्रपट - बाहुबली
४] नर्गिस दत्त पुरस्कार - तनु वेड्स मनू रिटर्न्स

१०] २०१६-१७ रेल्वे अंदाजपत्रक सादर करतेवेळी घोषित केल्या गेलेल्या नवीन रेल्वे गाड्याबाबत जोड्या लावा.
१] तेजस            १] पूर्णतः वातानुकूलित सेवा
२] हमसफर        २] पूर्णतः अनारक्षित सेवा
३] अंत्योदय        ३] डबल डेकर वातानुकूलित सेवा
४] उदय             ४] अतिवेगवान गाडी [ १३० किमी प्रति तास ]
१] १,२,३,४, २] ४,१,२,३ ३] ४,३,२,१ ४] ३,४,१,२

११] शरद जोशी यांनी पुढील कोणती ग्रंथ लिहिली?
१] आन्सरिंग बिफोर गॉड २] डाऊन टू अर्थ ३] द वुमन्स क्वेश्चन ४] फार्मरस पेरील
१] फक्त १,२,३ २] फक्त १,२,४ ३] फक्त १,३,४ ४] फक्त २,३,४

१२] वरुणा नाविक अभ्यास हा कोणत्या दोन देशातील आहे?
१] भारत अमेरिका २] भारत चीन ३] भारत फ्रांस ४] भारत रशिया

१३] शेतकऱ्यांना समर्पित असलेली भारतातील प्रथम दूरदर्शन वाहिनी कोणती होती?
१] डी डी पिके २] डी डी भारती ३] डी डी कृषी ४] वरीलपैकी एकही नाही

१४] खालील विधाने विचारात घ्या:
१] जागतिक अर्थ परिषदेने [WEF] जाहीर केलेल्या जगातील राहण्यायोग्य ६० सर्वोत्तम देशांच्या प्रारंभिक यादीमध्ये भारताचा २२ वा क्रमांक आहे.
२] सदरहू यादी ही स्थिरता, सांस्कृतिक प्रभाव, उद्योजकता, आर्थिक प्रभाव आणि जीवनशैली यावर आधारित तयार करण्यात येते.
३] या यादीमध्ये स्विडनला सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे.
४] या यादीमध्ये जर्मनीचा दुसरा क्रमांक आहे.
खालील पैकी कोणते विधान बरोबर आहे?
१] फक्त १ २] १ आणि २ ३] १ ३ आणि ३ ४] २ ३ आणि ४

१५] २०१६ चे एडगर अॅलन पो पारितोषिक मिळविणाऱ्या भारतीय अमेरिकन पत्रकार नीला बॅनर्जी या - - - - नावाच्या वृत्त संस्थेसाठी काम करतात?
१] एजन्सी फ्रांस प्रेसे २] अल जजिरा ३] इनसाईड क्लायमेट न्यूज ४] इंडो एशियन न्यूज सर्व्हिस

१६] कोणत्या समित्यांमध्ये डॉ बी आर आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले?
१] मूलभूत अधिकार समिती २] अल्पसंख्यांक उपसमिती ३] सल्लागार समिती ४] राज्ये समिती
१] फक्त १,२,३ २] फक्त २,३,४ ३] फक्त १,२,३ ४] फक्त १,३,४

१७] परकीय आक्रमणाच्या कारणास्तव राष्ट्रीय आणीबाणीची उद्घोषणा झाल्यास खालीलपैकी कोणते मूलभूत अधिकार निलंबित होऊ शकतो?
१] भाषण व अभिव्यक्ती स्वतंत्र २] वृत्तपत्र स्वतंत्र ३ मुक्त संचार स्वतंत्र ४] जीवित व व्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण
१] १ आणि २ २] फक्त ३ ३] १,२,३,४ ४] फक्त १,२,३

१८] खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्वे ही मूळच्या राज्यघटनेत समाविष्ट नव्हती परंतु ज्यांच्या समावेश नंतर १८ व्या राज्यघटना दुरुस्तीद्वारे करण्यात आला?
१] कामगारांना काम, निर्वाह वेतन, चांगले जीवनमान आणि पर्याप्त सामाजिक व सांस्कृतिक संधी मिळावी.
२] कामगारांना व्यवस्थापनात सहभाग मिळावा यावा यासाठी पावले उचलली.
३] सर्वाना समान न्यायाची हमी आणि गरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य देणे.
४] पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी आणि वने व वन्य जीवसृष्टी यांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करणे.
१] १,२,३ २] २,३,४ ३] १,२,४ ४] १,३,४

१९] - - - - - -- मधील विविध जातीधर्माच्या कामगारांनी केलेल्या संपाला जवाहरलाल नेहरू आणि व्ही व्ही गिरी यासारख्या राष्ट्रीय नेत्यांनी पाठिंबा दिला?
१] गिरणी कामगार संघटना २] लीग फॉर स्ट्रगल अगेन्स्ट फॅशिझम अँड इम्पिरिअलाझम ३] खरगपूर लोकोमोटिव्ह रिपेअर अँड मेन्टेन्स वर्कशॉप ४] सदर्न मराठा रेल्वे

२०] योग्य कथन ओळखा?
१] अनुच्छेद ४७ प्रमाणे सर्व बालकांना वयाच्या १४ वर्षापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण असावे.
२] ८६ व्या घटनादुरुस्तीद्वारे ६ ते १४ वर्षापर्यंतच्या मुलासाठी शिक्षण हे मूलभूत अधिकाराचे समाविष्ट करण्यात आले.
१] १ बरोबर २ चुकीचे २] १ चुकीचे २ बरोबर ३] १ आणि २ बरोबर ४] १ आणि २ चुकीची आहेत

२१] विभाजनानंतर आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती - - - - - - सारखी बनविली जात आहे?
१] शांघाय २] सिंगापूर ३] ऍमस्टरडॅम ४] लॉस एंजलिस

२२] पुढील विधाने वाचून त्यात कोणत्या संघटनेचे वर्णन केले आहे ते ओळखा?
१] १८७५ पासून दर रविवारी हा समाज प्रार्थना सभा घेत असे.
२] त्यांनी पुण्यात [ सुशिक्षणगृह ] सुरु केले.
३] विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्वस्पर्धा आयोजित केल्या जात.
४] १८७३ पासून हिच्या कार्याला सुरवात झाली.
१] आर्य महिला समाज २] सत्यशोधक समाज ३] प्रार्थना समाज ४] ब्राम्हो समाज

२३] भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय सम्मिलीत झाले आहे.?
१] राष्ट्राची एकता २] राष्ट्राची अखंडता
१] केवळ १ २] केवळ २ ३] दोन्ही ४] दोन्ही प्रथमपासूनच सम्मिलीत होते

२४] खालील विधाने विचारात घ्या:
१] सर्व पोलीस ठाणे ऑनलाईन जोडली जाणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.
२] सी सी टी व्ही निगराणीसाठी असलेले पुणे हे देशातील पहिले शहर ठरले आहे.
१] १ बरोबर २ चूक २] २ बरोबर १ चूक ३] दोंन्ही विधाने चुकीची आहेत ४] दोन्हीही विधाने बरोबर आहेत

२५] खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
१] बेरुबारी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग असल्याचा निर्णय दिला आहे.
२] केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग नसल्याचा निर्णय दिला होता.
३] सरनाम्यामध्ये आतापर्यंत घटनादुरुस्तीद्वारे दोन वेळा बदल करण्यात आलेले आहेत.
४] वरील एकही नाही

२६] उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी अरण्यात पुढीलपैकी कोणती झाडे आढळतात?
१] सागवान २] सिसम ३] अंजन ४] तीवर ५] हिरडा
१] १,३,४,५ २] ३,४,५ ३] १,२,३ ४] १,२,३,५

२७] - - - - - - -  मुख्य उणीव म्हणजे ह्यात मुसलमानांचा, विशेषकरून मुसलमान शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळविता आला नाही.
१] भारत छोडो आंदोलनाची २] दांडी यात्रेची ३] स्वदेशी चळवळीची ४] शेतकरी चळवळीची

२८] ब्रिटिशांनी महाराष्ट्रात रयतवारी पद्धत का लागू केली?
१] जमीनदाराला आळा घालण्यासाठी २] कायमधारा पद्धतीमधील दोष दूर करण्यासाठी ३] जमिनीची मोजणी करण्यासाठी ४] शेतकऱ्यांचा फायदा करण्यासाठी
१] १ आणि २ २] ३ फक्त ३] १ आणि ४ फक्त ४] ४ फक्त

२९] श्रीपाद अमृत डांगे, शौकत उस्मानी, मुझफर अहमद व नलिनी गुप्ता यांना ज्या खटल्यात चार वर्षाच्या करावासासाठी शिक्षा झाली तो खटला कसा ओळखला जातो?
१] कानपुर कट २] मीरत कट ३] काकोरी कट ४] वरीलपैकी नाही

३०] अखिल भारतीय महिला परिषदेच्या पहिल्या सभेच्या अध्यक्षा - - - - - - होत्या?
१] विजयालक्ष्मी पंडित २] सांगलीच्या राणीसाहेब ३] महाराणी चिमाबाईसाहेब गायकवाड ४] विजयराव शिंदे

३१] १८९२ च्या फॅक्ट्री ऍक्ट प्रमाणे :
१] स्त्री कामगारांना ११ तास काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
२] स्त्री कामगारांना दुपारच्य्यावेळी अर्धा तास विश्रांती देण्यात आली.
३] स्त्री पुरुष कामगारांचे आठवड्याच्या कामाचे साठ तास निश्चित करण्यात आले.
४] आठवड्यातून एक सुट्टी कामगारांना देण्यात आली.
१] १,२,३ २] ३ ३] ४ फक्त ४] १ फक्त

३२] खालील जोड्या लावा
१] आय टी हार्डवेअर पार्क     १] कुडाळ
२] सिपझ                           २] नाशिक
३] मेल्ट्रॉन सेमीकंडक्टर       ३] मुंबई
४] मायक्रो प्रोसेसर आधारित
प्रणाली प्रकल्प                    ४] द्रोणागिरी
१] ३,४,२,१ २] ४,३,२,१ ३] १,२,३,४ ४] ४,३,१,२

३३] भेटेन नऊ महिन्याची ही कविता पुढीलपैकी कोणत्या कवीने चौरी चौरा घटनेत भाग घेतलेल्या व त्यासाठी फाशीवर जाणाऱ्या कैद्याला उद्देशून लिहिली होती?
१] कुंजविहारी २] कुसुमाग्रज ३] गोविंद ४] नारायण केशव बेहेरे

३४] जोड्या जुळवा
१] मोतीबाई    १] राणीने झाशी सोडल्यापासून तिच्याबरोबर सावली सारखी होती
२] ललिताबाई २] राणी लक्ष्मीबाई सारखी दिसणारी तिची दासी
३] काशी        ३] झाशीच्या राणीची महत्वाची सरदार
४] मुंदर          ४] झाशीच्या राणीच्या हेरखात्याची प्रमुख
१] ४,३,२,१ २] १,२,३,४ ३] १,२,४,३ ४] ३,१,४,२

३५] वॉर कौन्सिलचे सभासद व ते जेथून आले होते त्या ठिकाणांच्या जोड्या लावा:
१] जी व्ही केतकर १] पुणे
२] व्ही व्ही आठल्ये २] सातारा
३] एस पी पटवर्धन  ३] रत्नागिरी
४] व्ही व्ही दस्ताने   ४] भुसावळ
१] ४,३,१,२ २] ३,२,४,१ ३] २,१,४,३ ४] १,२,३,४

३६] मद्रासमध्ये बी ए करता अभ्यास करणारी ती पहिली हिंदू विधवा होती. लोक तिला वाळीत टाकण्याची धमकी देत. तिला रस्त्यात छळत. १९११ मध्ये तिने बी ए पूर्ण केले. ती जरी ख्रिश्चन झाली तरीही तरी तिला आस्थेने सिस्टर म्हणत?
१] सुब्बलक्ष्मी २] सरलादेवी ३] अंबुजम्माल ४] अम्मूस्वामिनाथन

३७] [डेक्कन रयत समाजाची स्थापना] ही संस्था कोणाच्या पुढाकाराणे स्थापन झाली होती?
१] अण्णासाहेब लठ्ठे २] वालचंद कोठारी ३] मुकुंदराव पाटील ४] दिनकरराव जवळकर
१] १,२,३ २] १,२,४ ३] १,३,४ ४] १,४

३८] १८५५ मध्ये मुंबई सरकारने २ कोटी रुपये रोड, कॅनॉल इत्यादी बांधण्यासाठी घेतले होते परंतु तो पैसा - - - - - -
यासाठी वापरण्यात आला?
१] मराठा युद्ध २] अफगाण युद्ध ३] बर्मा युद्ध ४] मैसूर युद्ध

३९] पुढील वाक्यावरून व्यक्ती ओळखा - त्यांचा जन्म ७ मार्च १८२४ साली टंकारा मोर्वी येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अंबाशंकर होते व ते अतिशय सनातनी होते?
१] वि आर कोठारी २] दयानंद सरस्वती ३] करसनदास मुळजी ४] कवी नर्मदा  

४०] जातीयवादाची - - - - - - सुरवात या ब्रिटिश इतिहासकारांनी, ज्याने भारतीय इतिहासाच्या प्राचीन व मध्ययुगीन काळाला मुस्लिम काळ असे संबोधिले होते, त्यांनी केली असे म्हणावे लागेल?
१] अरनॉल्ड टॉयन २] जेम्स मिल ३] चार्ल्स इमर्सन ४] व्ही ए स्मिथ

४१] भारतात सागरी मत्स्य उत्पादनात खालीलपैकी कोणते राज्य अग्रेसर आहे?
१] आंध्र प्रदेश २] तामिळ्नाडू ३] महाराष्ट्र ४] केरळ

४२] खालील विधानांचा विचार करा:
१] भारतामध्ये ६ वर्षाखालील लोकसंख्येची टक्केवारी २००१ मध्ये १५.९ पासून २०११ मध्ये १२.१ एवढी घटली?
२] २०११ च्या जणगणनेनुसार जम्मू व काश्मीर राज्य सोडून भारतातील इतर सर्व राज्यात ६ वर्षाखालील लोकसंख्येची टक्केवारी घटली आहे.
वरील कोणते विधाने बरोबर आहेत?
१] फक्त १ २] फक्त २ ३] १ आणि २ दोन्ही ४] १ आणि २ दोन्हीही नाही

४३] सोलापूर - धुळे महामार्गावर शहरे कोणती?
१] तुळजापूर २] लातूर ३] बीड ४] उस्मानाबाद ५] चाळीसगाव
१] १,२,४,५ २] १,४,३,५ ३] १,४,३,५ ४] १,२,३,५

४४] खालील विधाने पहा:
१] मुंबईमध्ये २६ जुलै २००५ रोजी ९०० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला होता.
२] मावळ प्रदेशात पूर्वेकडून पश्चिमेकडे पर्जन्याचे प्रमाण वाढत जाते.
३] दक्षिण कोकणात उत्तर कोकणापेक्षा पर्जन्याचे प्रमाण जास्त असते.
१] १ आणि २ बरोबर २] १ आणि ३ बरोबर ३] २ आणि ३ बरोबर ४] वरील सर्व

४५] खालील विधानांचा विचार करा:
१] भारताच्या एकूण रस्त्याची लांबीची टक्केवारी १२.७८% उत्तरप्रदेश मध्ये असून त्या खालोखाल अनुक्रमे महाराष्ट्र व राजस्थान ह्यांचा क्रमांक लागतो.
२] डांबरी रस्त्याचे प्रति १०० चौकिमी लांबीचे जाळे हे गोवा राज्यात सर्वात जास्त असून [२०३.५४] त्या खालोखाल केरळ व पंजाब राज्याच्या क्रमांक लागतो.
१] १ आणि २ बरोबर २] १ आणि २ चूक ३] १ चूक २ बरोबर ४] १ आणि २ चूक

४६] खालीलपैकी कोणते घटक कोकणात मासेमारी व्यवसाय वाढवण्यास कारणीभूत झाले?
१] सरळ समुद्र किनारा २] विस्तीर्ण समुद्र बूड ३] सहकारी संस्था ४] सरकारी आधार
१] १,२,३ २] २,३,४ ३] १ आणि २ ४] वरील सर्व

४७] खालील विधाने पहा:
१] पश्चिम राजस्थानच्या वाळवंटात आढळणाऱ्या क्षारयुक्त मृदेस रेह अथवा कल्लार म्हणतात.
२] भंगार मृदा नदीजवळ गाळाच्या संचयनाने तयार होते.
३] खादर मृदा हिमालयाच्या पायथ्याशी आढळते.
१] १ बरोबर २] २ बरोबर ३] ३ बरोबर ४] १,२,३ बरोबर नाहीत

४८] खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग पनवेल आणि गोव्यास जोडतो?
१]  NH १३ २] NH १६ ३] NH १७ ४] NH ७

४९] २०११ च्या जणगणनेनुसार खालील विधाने पहा:
१] बिहार, पश्चिम बंगाल, व केरळ ह्या राज्यांनी प्रति चौ किमी माणसाच्या घनतेचा १००० हा आकडा ओलांडला आहे.
२] अरुणाचल प्रदेश, मिझोराम व सिक्कीम ह्या राज्यांनी प्रति चौकिमी माणसांची घनता १०० पेक्षा कमी आहे.
१] १ आणि २ बरोबर २] १ बरोबर २ चूक ३] १ चूक २ बरोबर ४] १ आणि २ चूक

५०] खालील विधाने पहा:
१] महाराष्ट्रमध्ये मराठी, हिंदी, व उर्दू, भाषा बोलणाऱ्या लोकांच्या टक्केवारीवरील क्रमांक प्रथम, द्वितीय, व तृतीय आहेत.
२] तसेच गुजराती, कन्नड, सिंधी तेलगू भाषा बोलणाऱ्या लोकांची एकूण टक्केवारी ही उर्दू भाषा बोलणाऱ्या लोकांच्या टक्केवारीपेक्षा कमी आहे.
१] १ आणि २ बरोबर २] १ बरोबर २ चूक ३] १ चूक २ बरोबर ४] १ आणि २ चूक

५१] कुहरी बेसाल्ट खडक म्हणजे काय?
१] लाव्हारसमध्ये तयार झालेला खडक २] पोकळ्यांनी युक्त बेसाल्ट खडक ३] भेगांमध्ये लाव्हारस थंड होऊन झालेला खडक
१] फक्त १ २] १ आणि २ ३] फक्त २ ४] वरील सर्व

५२] खालील विधाने पहा:
१] जेट वायूच्या प्रभावामुळे हिवाळ्यात काश्मीर व हिमाचल प्रदेशात पाऊस आणि हिमालयात बर्फ पडतो.
२] हिवाळ्यात तामिळनाडूमध्ये ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे पाऊस पडतो.
३] बंगालमध्ये उन्हाळ्यात उष्ण हवेचे प्रवाह वाहतात त्यांना कालबैसाखी असे म्हणतात.
१] १ बरोबर २] २ बरोबर ३] ३ बरोबर ४] वरील सर्व विधाने बरोबर

५३] खालील विधानांचा विचार करा:
१] एल निनो प्रवाहाच्या वेळी दक्षिण प्रशांत महासागरावरील पृष्ठभागावरील तापमानात वाढ होते.
२] वर्ष २०१३-१४ मध्ये भारतामध्ये भीषण दुष्काळ होता आणि त्यावेळी एल निनो प्रवाह प्रबळ होता.
१] फक्त १ बरोबर २] फक्त २ बरोबर ३] १ आणि २ बरोबर ४] १ आणि २ चूक

५४] महाराष्ट्रातील खालील नद्या पाणलोट क्षेत्राच्या क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने लिहा?
१] वर्धा २] कोयना ३] उल्हास ४] सावित्री
१] १,२,३,४ २] २,३,४,१ ३] १,२,३,४ ४] ४,३,२,१

५५] जोड्या लावा
     गायीचे नाव             आढळस्थान
१] देवणी                   १] अहमदनगर
२] डांगी                    २] नागपूर
३] गौळाऊ                ३] उस्मानाबाद
४] सोरटी                 ४] रायगड  
१] ४,३,२,१ २] ३,४,१,२ ३] १,२,३,४ ४] ३,४,२,१

५६] जसजशी भारतीय अर्थव्यवस्था विकसित होत आहे, तसतसा शेतीचा स्थूल देशांतर्गत उत्पन्नातील वाटा कमी कमी होत आहे. आज तो केवळ १४.१ टक्क्यावर आला. असे असले तरीही देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती महत्वाची आहे.
१] भारतीय अर्थव्यवस्था परंपरेने कृषीप्रधान राहिलेली आहे.
२] शेती उद्योगाला मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य [ sabsidy ] मिळते.
३] शेतीमधून उद्योगासाठी लागणारा कच्चा माल उत्पादित होतो.
४] शेतीक्षेत्र ५०% हुन अधिक लोकांना थेट रोजगार देते.

५७] जोड्या लावा
     वर्गीकृत बँक २०१४              संख्या
१] सार्वजनिक क्षेत्रातील बँक      १] २१
२] खाजगी क्षेत्रातील बँक           २] २६
३] भारतातील विदेशी बँक         ३] ६४
४] प्रादेशिक ग्रामीण बँका           ४] ४३
१] १,२,३,४ २] २,१,४,३ ३] ४,३,२,१ ४] ३,४,१,२

५८] २६ ऑगस्ट २०१० रोजी खालीलपैकी कोणती बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया विलीन करण्यात आली?
१] द स्टेट बँक ऑफ हैद्राबाद २] द स्टेट बँक ऑफ म्हैसूर ३] द स्टेट बँक ऑफ त्रावणकोर ४] द स्टेट बँक ऑफ इंदोर

५९] निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने अनेक मंडळे आणि संघटना स्थापन केल्या आहेत. त्या त्या आहेत.
१] निर्यात विकास मंडळ
२] शेती आणि प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ निर्यात विकास मंडळ
३] वस्तू मंडळे
४] पायाभूत सुविधा विकास आणि वित्तीय महामंडळ
१] १ बरोबर २] १,२, ३ बरोबर ३] ३ बरोबर ४] १,२,४ बरोबर

६०] लोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यावर
१] जन्मदर उच्च परंतु मृत्युदर वेगाने घटतो.
२] जन्मदर कमी परंतु मृत्युदर वेगाने वाढतो.
३] मृत्युदर अधिक राहतो परंतु जन्मदर वेगाने घटतो.
४] वरील एकही नाही.

६१] महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना हा आंतरराष्ट्रीय पातळीवरील पहिलाच अभूतपूर्व प्रमाणातील वेतनधारी रोजगार हमी कायदा आहे. त्याचे मुख्य यश पुढील बाबीत आहेत.
१] रोजगार संधीत वाढ २] वेतन मिळकत वाढण्यास मदत ३] वित्तीय समावेशन ४] महिला सक्षमीकरणास मदत
१] १ आणि २ बरोबर २] २ आणि ३ बरोबर ३] १,२,३ बरोबर ४] वरील सर्व बरोबर

६२] भारतीय बँकाच्या एकूण कर्जपुरवठ्यापैकी अग्रगण्य क्षेत्रासाठी - - - - -- इतका कर्जपुरवठा अपेक्षित आहे?
१] ४०% २] १८% ३] ३५% ४] २०%

६३] २०१३-१४ या वर्षी भारतात - - - - - -  या पिकाची लागवड अन्न धान्याखालील एकूण क्षेत्राच्या सर्वात जास्त प्रमाणात दिसून येते?
१] गहू २] तांदूळ ३] ज्वारी ४] मका

६४] - - - - - - - जीवनसत्वाची कमतरता प्रौढांमध्ये फारच कमी जाणवते, परंतु नवजात बालकामध्ये त्यामुळे रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते?
१] के k २] बी b ३] ए a ४] सी c

६५] गार म्हणजे [GAAR] म्हणजे:
१] जागतिक करचुकवेगिरी विरोधातील नियम
२] अमेरिकन सामान्य लेखा नियम
३] जागतिक लेखा व परीक्षण नियम
४] सर्वसाधारण कर चुकवेगिरी विरोधातील नियम

६६] सर्वसाधारण [ निरोगी ] मानवी डोळ्याचा स्पष्ट दृष्टीचा टप्पा [ डी, डी व्ही ] किती असतो?
१] ३० सेमी २] १५ सेमी ३] २५ सेमी ४] ४० सेमी

६७] २०१० पासून मानवी विकास निर्देशांक [HDI] ची व्याख्या ही प्रत्येक पैलूतील यश मापन करणाऱ्या सामान्य निर्देशांकाचे - - - - - - अशी केली जाते?
१] गणित मध्य २] भूमितीय मध्य ३] मध्यक मूल्य ४] बहुलक मध्य

६८] खालील विधाने विचारात घ्या:
१] प्रधानमंत्री जण धन योजना २८ ऑगस्ट २०१४ रोजी सुरु करण्यात आली.
२] ही योजना बँक बचत खाते सुरु करण्यास प्रोत्साहन देते.
३] ही योजना अपघात विमा आणि जीवन विमा पुरवते.
४] ही योजना अधिकर्ष सवलत देते.
१] १ आणि २ बरोबर २] २ आणि ३ बरोबर ३] १,२,३ फक्त बरोबर ४] वरील सर्व विधाने बरोबर

६९] संयुक्त राष्ट्रसंघाच्या लोकसंख्या निधीच्या, जागतिक लोकसंख्या अहवाल २०११ नुसार भारताची लोकसंख्या २०२५ मध्ये - - - - - - इतकी होईल जेणेकरून चीनच्या १.३९ अब्ज लोकसंख्येच्या पुढे जाऊन जगातील लोकसंख्येच्या बाबतीत तो सर्वात मोठा देश ठरेल?
१] १.४४ २] १. ४६ ३] १.४५ ४] १.४७

७०] सुधारित लेखापरीक्षण प्रमाणक [एस ए ५३० ] हे - - - - - - शी संबंधित आहे?
१] लेखापरीक्षण नमुना २] लेखापरीक्षण नियोजन ३] लेखापरीक्षण अहवाल ४] वरीलपैकी एकही नाही

७१] वीज बिलातील एका युनिटचे kwh ऊर्जा मूल्य किती असते?
१] ३६*१०\५ ज्यूल्स २] ३८*१०/५ ज्यूल्स ३] ४०*१०/५ ज्यूल्स ४] ४२*१०/५ ज्यूल्स

७२] खगोलशास्त्राला समर्पित असलेली भारताची पहिली अंतरिक्ष उपग्रह वेधशाळा - - - - - - होय?
१] ऍस्ट्रोनॉट २] मार्स ऑर्बिटर मिशन ३] ऍस्ट्रोनॉट ४] यापैकी नाही

७३] चष्म्याचे भिंग - - - - - यापासून बनवतात?
१] पायरेक्स काच २] फ्लिंट काच ३] सामान्य काच ४] कोबाल्ट काच

७४] अमलगममध्ये नितांत आवश्यक काय असते?
१] पारा २] चांदी ३] लोह ४] प्लॅटिनम

७५] कोळशाच्या डिस्ट्रीक्टिव्ह औद्योगिक रसायने प्राप्त होतात. डिस्ट्रिसिटीव्ह डिस्टिलेशन कसे केले जाते?
१] बर्फाच्या साहाय्याने २] हवेच्या साहायाने ३] पोकळीत ४] जमिनीखाली

७६] पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते [ फूल्स गोल्ड / मूर्खाचे सोने ] असे ओळखले जाते?
१] हॅमेसाईट २] मॅग्नेटाइट ३] साडेराइट ४] पायराइट

७७] वनस्पतीवाढीसाठी अत्यावश्यक भूमिका प्रदान करणारे अन्नद्रव्य खालीलपैकी कोणते आहे?
१] मोलिबडीनम २] बोरॉन ३] नत्र ४] तांबे

७८] खालीलपैकी कोणता ग्रुप [ ड्युअल प्लांट ] म्हणून ओळखला जातो?
१] शेवाळ २] लायकेन्स ३] अँजिओस्पर्म्स ४] कवक

७९] - - - - - -  ही वनस्पती बहुतांशी हिरवळीचे खत म्हणून वापरली जाते आणि तिची तृणधान्यांच्या पिकाबरोबर फेरपालट म्हणून लागवड करतात?
१] सेसबानिया कॅनॉबीचा २] ट्रायडॅक्स प्रोकुंबन्स ३] हिबिसकस रोझसायनेसीस ४] सिनेड्रिला नोडिफ्लोरा

८०] खालीलपैकी कोणता प्राणी अरीय समपीत आहे?
१] बेडूक २] पायला ३] मासा ४] तारामासा

८१] खाली उल्लेख केलेले सर्व गुणधर्म कोणत्या संधीपातात असतात?
१] स्पर्शिकाच्या जोड्या २] वृतांवरील संयुक्त नेत्र ३] श्वसनासाठी कल्ले ४] मौखिक उपांगांच्या ३ वा अधिक जोड्या
१] खेकडा २] फुलपाखरू ३] गोम ४] विंचू

८२] सॅलमॅनडर ह्या प्राण्याचे वर्गीकरण, कोणत्या वर्गात करतात?
१] एव्ह्ज पक्षिवर्ग २] सस्तन प्राणिवर्ग ३] उभयचर प्राणिवर्ग ४] सरीसृप

८३] बटाटे, कांदे, यासारख्या भाज्यांना कोंब येऊ नयेत यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात?
१] अल्फा २] गॅमा ३] मायक्रोवेव्ह्ज ४] अल्ट्राव्हायोलेट

८४] हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थामध्ये कोणता जिवाणू वाढण्याची शक्यता असते?
१] स्टोफिलोकोस २] बॅसिलस ३] स्ट्रेप्टोकोस ४] क्लोस्ट्रिडीयम

८५] HIV लागणच्या व्यवस्थापन आणि उपचारासाठी कोणते औषध वापरतात?
१] रिटोनावीर २] पेनिसिलीन ३] रिफापीसीन ४] वान्कोमायसीन

८६] पुढील मांडणीतील प्रश्नचिन्हाऐवजी ठेवण्यासाठी तर्कसंगत संख्या दिलेल्या पर्यायातून उत्तर निवडा?
[ २५ - २७ - २१ ] - [ ? - १३ - २३ ] [ २९ - १९- १७ ]
१] २६ २] २४ ३] ३१ ४] ३५

८७] अमोलला एक किलोमीटर धावायला साडेचार मिनिटे लागतात तर बिट्टू तेच अंतर धावायला ५ मिनिटे घेतो. जर त्यांना एक किलोमीटर अंतरावरील ठिकाणी एकाच वेळी पोहोचण्यासाठी अपेक्षा असेल तर एकाने दुसऱ्याला किती मीटरची आघाडी द्यायला हवी?
१] २०० मीटरची आघाडी बिट्टूला २] १५० मीटरची आघाडी बिट्टूला ३] ८० मीटरची आघाडी अमोलला ४] १०० मीटरची आघाडी बिट्टूला

९२] अ चे वय ब च्या वयापेक्षा तिप्पट आहे. चार वर्षांपूर्वी क चे वय अ च्या तेव्हाच्या वयाच्या दुप्पट होते. चार वर्षानंतर अ चे वय ३१ वर्ष असेल तर ब चे व क चे आजचे वय किती?
१] १०, ५० २] १०, ४६ ३] ९, ५० ४] ९, ४६

९५] विधान - राणीच्या आजोबाचा मुलगा हा राणीच्या मुलाचा आजोबा असू शकतो. या विधानासंबंधात जर फक्त थेट नातेसंबंधांचा विचार केला तर योग्य निष्कर्ष निवडा.
१] जर राणी त्या आजोबाच्या मुलाची मुलगी असली तरच विधान सत्य ठरेल.
२]  जर राणी त्या आजोबाच्या मुलाची मुलगी असली तरच विधान असत्य ठरेल.
३] तो आजोबांचा मुलगा राणीचा काका असला तरीही विधान सत्य ठरेल.
४] तो आजोबांचा मुलगा राणीचा मामा असला तरीही विधान सत्य ठरेल.
१] १ सोडून सर्व सत्य २] १ सोडून सर्व असत्य ३] फक्त ३ सत्य ४] फक्त १ आणि २ सत्य आहे.

९६] जर सांकेतिक भाषेत [ supar ] हा शब्द [HFKVI ] असा लिहितात. तर market हा शब्द कसा लिहितील?
१] NZIPVG २] NXIPVG ३] NYIPUG ४] NZIQVG

९७] पुढील सामग्री वापरून ran चे विसंकेतन करा.
१] qua ta pol ran हे I can rest here चे प्रतिरूपण आहे.
२] pol ran sak no हे I can sit there चे प्रतिरूपं आहे.
१] विसंकेतांसाठी फक्त माहिती १ पुरेशी आहे.
२] विसंकेतांसाठी फक्त माहिती २ पुरेशी आहे.
३] विसंकेतांसाठी फक्त माहिती १ व २ पुरेशी आहे.
४] विसंकेतांसाठी फक्त माहिती १ पुरेशी नाही.

९८] २०० पासून ४०० पर्यंत ४ हा अंक फक्त येणाऱ्या संख्या किती?
१] ३६ २] ३७ ३] ३८ ४] ३९

९९] दिवसभरात जेव्हा घड्याळाचे काटे नेमके परस्परांच्या विरुद्ध दिशेला असतात. अशा प्रसंगाची संख्या दर्शविणारा पर्याय निवडा?
१] २४ २] २३ ३] २२ ४] २१

उत्तरे - १] २, २] १, ३] २, ४] १, ५] १, ६] ४, ७] ३, ८] २, ९] २, १०] २, ११] १, १२] ३, १३] ४, १४] २, १५] ३, १६] १, १७] ४, १८] २, १९] ३, २०] २, २१] २, २२] २, २३] २, २४] ४, २५] ४, २६] ३, २७] ३, २८] १, २९] १, ३०] ३, ३१] १, ३२] २, ३३] १, ३४] १, ३५] ४, ३६] १, ३७] १, ३८] ३, ३९] १, ४०] १, ४१] ३, ४२] २, ४३] २, ४४] ४, ४५] ४, ४६] २, ४७] १, ४८] ३, ४९] ३, ५०] १, ५१] २, ५२] ४, ५३] ३, ५४] १, ५५] ४, ५६] ४, ५७] २, ५८] ४, ५९] २, ६०] १, ६१] ४, ६२] १, ६३] २, ६४] १, ६५] ४, ६६] ३, ६७] २, ६८] ४, ६९] २, ७०] १, ७१] १, ७२] ३, ७३] २, ७४] १, ७५] ३, ७६] ४, ७७] ३, ७८] २, ७९] १, ८०] ४, ८१] १, ८२] ३, ८३] २, ८४] ४, ८५] १, ८६] ३, ८७] ४, ९२] ३, ९५] २, ९६] १, ९७] ४, ९८] २, ९९] ३

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.