शुक्रवार, ६ जानेवारी, २०१७

शेतकऱ्यांच्या आत्महत्येत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर NCRB रिपोर्ट - ७ जानेवारी २०१७

                                                                                    शेतकऱ्यांच्या आत्महत्येत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर   NCRB रिपोर्ट - ७ जानेवारी २०१७ 
* शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाली असून २०१४ ते २०१५ मध्ये आकडा ४२ टक्क्यांनी वाढला आहे. असे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो [NCRB] च्या अहवालात सादर करण्यात आले. 

* २०१४ मध्ये ५६५० एवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. या आकडेवारीत मोठी वाढ झाली असून ८००७ एवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. 

* देशात सलग २०१४ व २०१५ या वर्षी दुष्काळ पडला होता. फक्त एकट्या महाराष्ट्रात एकूण ३०३० शेतकऱ्यांनी आत्महत्यांची नोंद झाली आहे. आणि त्यात महाराष्ट्र पहिल्या क्रंमांकावर आहे. 

* त्यानंतर अनुक्रमे तेलंगणा १३५८ दुसऱ्या, आंध्रप्रदेश १९९७ तिसऱ्या, मध्यप्रदेश ७०९ चौथ्या, तामिळनाडू ६०४ पाचव्या क्रमांकावर आहेत. 

* तसेच देशातील काही राज्यामध्ये एकही शेतकऱ्याने आत्महत्या केली असे सांगण्यात आले आहे ते राज्ये अनुक्रमे - बिहार, पश्चिम बंगाल, गोवा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, झारखंड, मिझोराम, नागालँड, उत्तराखंड, या राज्यांचा समावेश आहे. या राज्यामध्ये २०१५ मध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.